Video : नाशिकमधील सावरकरांचे स्मारक जिर्णोद्धाराच्या प्रतिक्षेत : आज स्वातंत्र्यवीर सावरकर यांची पुण्यतिथी

Video : नाशिकमधील सावरकरांचे स्मारक जिर्णोद्धाराच्या प्रतिक्षेत : आज स्वातंत्र्यवीर सावरकर यांची पुण्यतिथी

नाशिक l Nashik

स्वातंत्र्यवीर सावरकर जीवनातील दोन भाग करता येतील. अंदमानाहून सुटकेच्या आधीचे जीवन व सुटकेनंतरचे त्यांचे जीवन वेगळे होते. पहिल्या भागात आक्रमक, क्रांतिकारी सावरकर, क्रांतिकारकांचे प्रेरणास्थान सावरकर, धगधगते लेखन करणारे सावरकर असे त्यांचे रूप दिसते.

तर त्यांच्या जीवनाच्या दुसऱ्या भागात समाजक्रांतिकारक सावरकर, हिंदू संघटक सावरकर, भाषाशुद्धी चळवळ चालवणारे व श्रेष्ठ साहित्यिक सावरकर, समाजात प्रेरणा निर्माण करणारे वक्ते सावरकर, विज्ञाननिष्ठेचा प्रचार करणारे आणि हिंदू धर्म आधुनिक स्वरूपात मांडण्याचा प्रयत्‍न करणारे तत्त्वज्ञ व विचारवंत सावरकर अशा अनेक स्वरूपांत ते समाजासमोर आलेले दिसतात.

नाशिक जिल्ह्यात शिक्षेआधी बरीच वर्ष त्यांचे वास्तव होते. नाशिकमधील तीळभांडेश्वर लेन येथील अभिनव भारत मंदिरात त्यांचे वास्तव्य होते. या ठिकाणी त्यांनी क्रांतीकारकांचे स्मारक केले आहे. परंतु ही वास्तू जीर्ण झाली असून त्यांचा जिर्णोद्धार गरजेचा आहे.

या ठिकाणी सावरकर यांच्या जीवनातील अनेक प्रसंग मा.गो.कुळकर्णी यांनी चित्रीत केले आहे. हे सर्व चित्र, सावरकरांची हस्तलिखिते या वास्तूत आहेत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com