सावानाचे आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर

सावानाचे आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर

नाशिक । प्रतिनिधी Nashik

सार्वजनिक वाचनालयाचे ( SAVANA) आदर्श शिक्षक, प्राध्यापक पुरस्कार ( Aadarsha Shikshak Puraskar )जाहीर करण्यात आले. सार्वजनिक वाचनालय नाशिक व नागरिक शिक्षक गौरव समितीतर्फे यंदा 26 गुरुजनांचा सन्मान सोहळा ज्येष्ठ पत्रकार व विचारवंत डॉ. उदय निरगुडकर (Dr. Uday Nirgudkar)यांच्या हस्ते होणार आहे. चालू महिन्याच्या तिसर्‍या आठवड्यात सोहळा होणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली.

सार्वजनिक वाचनालय नाशिक आणि नागरिक शिक्षक गौरव समितीतर्फे गत 52 वर्षांपासून आदर्श शिक्षक पुरस्कार देण्याची परंपरा आहे. कवी श्रेष्ठ कुसुमाग्रजांनी सुरू केलेला सोहळा वाचनालयाची नागरिक शिक्षक गौरव समिती दरवर्षी करीत असते. भारतभरात शिक्षण क्षेत्रात काम करणार्‍या माननीय व्यक्तीमत्त्वांनी आजवर या कार्यक्रमासाठी उपस्थिती लावली आहे.

यावर्षी ज्येष्ठ पत्रकार विचारवंत डॉ. उदय निरगुडकर उपस्थित राहणार आहे, असे समितीचे अध्यक्ष डॉ. यशवंत पाटील, उपाध्यक्ष राजेंद्र निकम, कार्यवाह डॉ. धर्माजी बोडके व वाचनालयाचे अध्यक्ष प्राध्यापक दिलीप फडके यांनी सांगितले.

यावेळी गौरव समितीचे सदस्य प्राध्यापक हरीश आडके, डॉ. वेदश्री थिगळे, डॉ. दिलीप बेलगावकर, प्राचार्य दिनकर चिंचोरे, प्राचार्य उदय शेवतेकर, प्रकाश वैद्य, गुलाबराव भामरे, अमृता कवीश्वर, दादाजी अहिरे, राजेंद्र सोमवंशी, एकनाथ कांगणे, निर्मला अष्टपुत्रे, निळकंठ नेर, कार्याध्यक्ष गिरीश नातू, अर्थसचिव देवदत्त जोशी, कार्य सचिव संजय करंजकर, बालभवन प्रमुख सोमनाथ मुठाळ, मंगेश पाठक उपस्थित होते.

पुरस्कारार्थी

राजेश अमृतकर, शीतल कारवाळ, नंदलाल धांडे, शोभा सोनवणे, सुरेखा बोराडे, सचिन चांगले, वंदना खैरनार, सुरेखा सोनवणे, उच्च माध्यमिक विभाग- विष्णू उगले, डॉ. प्रसाद कुलकर्णी, डॉ. मृणालिनी देशपांडे, डॉ. पोपटराव विठ्ठल कोटमे, डॉ. रामकृष्ण गायकवाड, अर्जुन सोनकांबळे, प्राजक्ता भट, मीरा नलावडे, माधुरी निफाडे डॉ. प्रज्ञा पाटील, डॉ. प्रवीण घोडेस्वार, संगीता मळीकर, मालती कराड,चंद्रशेखर वाड, विजय मोरस्कर, मृदुला देशमुख, डॉ. कल्याणराव टकले, रवींद्र कदम.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com