
नाशिक । प्रतिनिधी | Nashik
सार्वजनिक वाचनालयाच्या (Public Libraries) वतीने 24 ते 31 डिसेंबरदरम्यान ग्रंथालय सप्ताहाचे (Library Week) आयोजन करण्यात आले आहे. औरंगाबादकर सभागृह येथे दररोज सायंकाळी 6 वाजता विविध विषयांवर नामवंंत वक्त्यांची व्याख्याने या सप्ताहात होणार आहे. याचबरोबर 2019 व 2020 या दोन वर्षांची वाड्:मय पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे, अशी माहीती अध्यक्ष प्रा. दिलीप फडके यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
प्रा. फडके, प्रमुख कार्यवाह डॉ. धर्माजी बोडके, कार्याध्यक्ष गिरीश नातू, सहसचिव अभिजित बगदे, ग्रंथसचिव जयप्रकाश जातेगावकर, सांस्कृतिक सचिव संजय करंजकर, प्रा. सोमनाथ मुठाळ, गणेश बर्वे, श्रीकांत बेणी यावेळी उपस्थीत होते. ग्रंथालय सप्ताहात 24 डिसेंबर रोजी दिलीप प्रभावळकर यांची अपर्णा वेलणकर व प्रा. अनंत येवलेकर मुलाखत घेणार आहे. (दि. 25) रोजी न्या. माधव जामदार हे भारतीय राज्यघटनेला अभिप्रेत असलेला न्याय, या विषयावर व्याख्यान देतील.
26 रोजी रामदास फुटाणे भारत कधी कधी माझा देश आहे, 27 रोजी अच्युत गोडबोले हे माझा लेखन प्रवास, या विषयावर बोलतील. दि. 28 रोजी वाचक मेळावा व प्रश्नमंजुषा कार्यक्रम होईल. 30 रोजी पद्मश्री गिरीश प्रभुणे यांचे जनजाती : प्राचीन भारताचा वैभव संपन्न वारसा या विषयावर तर 31 रोजी प. सा. नाट्यमंदिरात नीरजा धुळेकर यांचे अभिव्यक्ती आणि सेन्सॉरशिप या विषयावर व्याख्यान होईल. सावानातर्फे 27 डिसेंबर रोजी सायंकाळी 6 वाजता वाड:मयीन पुरस्कार दिले जाणार आहे.
यांत मनोज बोरगावकर (कादंबरी - नदीष्ट), दीप्ती राऊत (ललितेतर ग्रंथ - कोरडी शेतं.. ओले डोळे), दीपक करंजीकर (वैचारिक ग्रंथ - घातसूत्र), डॉ. विजय जाधव (लघुकथा - अस्वस्थ तांडा), संजय गोराडे ( कथा - निर्णय), अनिता पाटील (चरित्रात्मक कादंबरी - द्रष्टा अनुयात्रिंक), रवि वाळेकर ( शैक्षणिक ग्रंथ - इंडोनेशायन), सुलक्षणा महाजन व करुणा गोखले ( अनुवादित - तुम्ही बी घडा ना).31 डिसेंबर रोजी प. सा. नाट्यमंदिरात सायंकाळी 6 वाजता दिले जाणारे वाड:मयीन पुरस्कार : ज्ञानेश्वर जाधवर (कादंबरी - लॉकडाऊन),
डॉ. शंकर बोर्हाडे (ललितेतर ग्रंथ - विडीची गोष्ट), डॉ. जगन्नाथ पाटील (वैचारिक ग्रंथ - चंबूखडी ड्रीम्स), निलिमा भावे (लघुकथा - विस्तारणारं क्षितिज), मनोहर सोनवणे (उमेदिने लेखण करणार्यास - ब्रॅण्ड फॅक्टरी), मंजुश्री गोखले (चरित्रात्मक कादंबरी - समर्पण), ओंकार वर्तले ( शैक्षणिक ग्रंथ - प्रेक्षणीय महाराष्ट्राची भटकंत), मुकुंद वझे (अनुवादित - बिहाईंड दी सिन्स.