सावानाची वार्षिक सभा खेळीमेळीत

सावानाची वार्षिक सभा खेळीमेळीत

नाशिक । प्रतिनिधी | Nashik

सावानाची (SAVANA) वार्षिक सर्वसाधारण सभा (Annual General Meeting) वाद न झाल्याने पहिल्याच सर्वसाधारण सभेत सावानाने ‘तंटामुक्ती’च्या दिशेने पावले टाकली असल्याचे दिसून आले. विविध विषयांवर चर्चा करुन सभा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली.

सावाना अध्यक्ष प्रा. दिलीप फडके यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सभेत फेरमतमोजणीची मागणी (Demand for recount) किंवा त्यासाठी धर्मादाय आयुक्तांकडे किंवा न्यायालयात दावा केला जाणार नसल्याचे सांगितल्याने निदान निवडणुकीचा (election) वाद न्यायालयात जाणार नसल्याने सभासदांनी सुस्कारा सोडला.

सावानाच्या मु. शं. औरंगाबादकर सभागृहात झालेल्या या सर्वसाधारण सभेला प्रारंभी गणपूर्तीअभावी तहकूब करण्यात आली. त्यानंतर झालेल्या सभेत प्रा. फडके यांनी सर्व सभासदांना पुढील वर्षापासून सर्वसाधारण सभेची कार्यक्रम पत्रिका सर्व सभासदांना त्यांच्या मोबाइलवर (mobile) पीडीएफ (PDF) स्वरुपात पाठवली जाणार असल्याचे सांगितले. तसेच कामकाजातील नियमित माहितीसाठी तसेच सभासदांशी संवाद (Communication with members) साधण्यासाठी नवीन वर्षापासून सावाना संपर्क पत्रिका मोबाइलवर पाठविण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचे सांगितले.

लायब्ररी ऑन व्हिल्स (Library on Wheels) या उपक्रमासाठी घेतलेली गाडी करोना (corona) काळापासून गत 3 वर्षे बंद अवस्थेत असल्याने या योजनेला कार्यान्वित करण्यासाठी स्वतंत्र तांत्रिक समिती गठित करण्यात आली असून, तिच्या अहवालानंतरच नक्की काय करायचे, असा निर्णय सर्व मंडळाशी चर्चा करून घेणार असल्याचे सांगितले. त्याशिवाय अन्य काही वाचनालयांशी सहकार्य करार, पुस्तके पोहोचविण्यासाठी झोमॅटो (Zomato), स्विगीसारखा (Swiggy) काही पर्याय होऊ शकेल का ? अशा सर्व बाबींचा विचार करण्यात येत असल्याचेही प्रा. फडके यांनी नमूद केले.

सावाना, प. सा.सह सर्व इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट (Structural Audit) करून घेण्यात येणार असल्याचेही त्यांनी नमूद केले. तसेच त्याचवेळी आमची हरकत नसल्याचे पत्र आम्ही देऊनही निवडणूक निर्णय अधिकार्यांनी फेरमतमोजणी न करता केवळ तांत्रिक चूक सुधारली असल्याने त्याबाबत आता आपल्या स्तरावर काहीच करता येणार नसल्याचे जाहीर केले.

सावानाच्या अहवालात गत सर्वसाधारण सभेत अध्यक्ष झालेल्या नानासाहेब बोरस्ते यांचे नाव अध्यक्ष म्हणून न आल्याबद्दल प्रा. फडके यांनी दिलगिरी व्यक्त केली. पुढील वर्षीच्या अहवालात चूक सुधारून गत अध्यक्षांच्या नामावलीत त्यांचे नाव, त्यांचा फोटोदेखील घेण्यासह सावानातही फोटो लावण्यात येणार असल्याचे नमूद केले.

अनेक सभासदांनी चर्चेत सहभाग नोंदवून काही उपयुक्त सूचना केल्या. यावेळी व्यासपीठावर उपाध्यक्ष वैद्य विक्रांत जाधव, कार्याध्यक्ष गिरीश नातू, प्रमुख सचिव डॉ. धर्माजी बोडके, सहायक सचिव अभिजित बगदे, अर्थ सचिव जोशी, ग्रंथसचिव जयप्रकाश जातेगावकर, नाट्यगृह सचिव सुरेश गायधनी, सांस्कृतिक कार्यसचिव संजय करंजकर, वस्तुसंग्रहालय सचिव प्रेरणा बेळे तसेच कार्यकारिणी मंडळ सदस्य सोमनाथ मुठाळ, गणेश बर्वे, प्रशांत जुन्नरे, मंगेश मालपाठक, उदयकुमार मुंगी, श्रीकांत बेणी, अ‍ॅड. भानुदास शौचे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com