
नाशिक | प्रतिनिधी | Nashik
सार्वजनिक वाचनालय नाशिकच्या निवडणुकीसाठी (Savana Election) आज बिटको विद्यालयामध्ये मतदान पार पडले. एकूण 6 हजार 189 आजीव सभासदांपैकी 3 हजार 904 जणांनी मतदानाचा हक्क बजावला...
आज (दि.८ मे) रोजी झालेल्या निवडणुकीत एकूण मतदान झाले असून टक्केवारीचा विचार करता ६३.१८ एवढे टक्के मतदान झाले आहे. सोमवारी अध्यक्ष आणि उपाध्यक्ष तर मंगळवारी कार्यकारिणी मंडळाची मतमोजणी होऊन निकाल घोषित होणार आहे.
दरम्यान, गेल्या दीड ते दाेन महिन्यांपासून चर्चेत असलेल्या सार्वजनिक वाचनालयाच्या २०२२ ते २०२७ या कालावधीच्या कार्यकारिणीसाठी अखेरीस रविवारी (दि. ८) मतदान झाले.
यावेळी ग्रंथमित्र आणि ग्रंथालय भूषण असे दाेन पॅनल तयार झाले होते शिवाय १२ वैयक्तिक उमेदवार रिंगणात होते. त्यामुळे एकूण ४८ उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले आहे.