सावाना निवडणूक : नानासाहेबांची फक्त चर्चाच; तीन नव्हे तर इतके पॅनल?

अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी काय झाले? 'इतक्या' अर्जातून ठरणार अंतिम उमेदवार
सावाना निवडणूक : नानासाहेबांची फक्त चर्चाच; तीन नव्हे तर इतके पॅनल?

नाशिक । प्रतिनिधी Nashik

जिल्ह्यातील सांस्कृतिक मानबिंदू असलेल्या सर्वजनिक वाचनालय (Sarvjanik Vachnalaya, Nashik) निवडणुकीच्या (Election) अर्ज दाखल करण्याचा अंतिम दिवशी अध्यक्षपदासाठी ४, उपाध्यक्ष पदासाठी ५ उमेदवारांसह एकूण ९० अर्ज दाखल झाले आहेत. छाननी नंतर या ९० उमेदवारांमधून अंतिम उमेदवार ठरणार आहे...

दरम्यान, गेल्या ३ दिवसापासून सुरू असलेल्या अर्ज विक्रीचा आज (दि.२०) शेवटचा दिवस होता. तीन दिवसात १२८ अर्जाची विक्री झाली त्यापैकी ९० उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. शुक्रवारी अर्ज छाननी होऊन वैध उमेदवारांची यादी शनिवारी प्रसिद्ध होणार आहे.

अध्यक्षपदासाठी वसंतराव खैरनार, दिलीप फडके, मकरंद सुखात्मे आणि विलास पोतदार यांनी अर्ज दाखल केला आहेत. मिलिंद गांधी यांनी अध्यक्षपदासाठी अर्ज नेला होता. मात्र, दाखल केला नाही. तर उपाध्यक्ष पदासाठी सुनील कुटे, मानसी देशमुख, दिलीप धोंडगे, वैद्य विक्रांत जाधव, बाळासाहेब गुंजाळ यांनी अर्ज दाखल केला आहे. समीर शेटे, हंसराज वडघुले, डॉ. धर्माजी बोडके, रवींद्र कदम, प्रशांत पाटील यांनी उपाध्यक्ष पदासाठी अर्ज नेले होते मात्र, त्यांनी अर्ज दाखल केले नाही.

तीन नाही तर चार पॅनल असणार

निवडणुकीसाठी असलेले उमेदवार आणि त्यांचे संघटन बघता यंदाच्या सावाना निवडणुकीत तीन नाही तर चार पॅनल असल्याची चर्चा आहे. यामध्ये जातेगावकर यांचा एक, बेनी यांचा एक तर गेल्या वेळी जनस्थानच्या विनायक रानडे वगळता इतर सर्व उमेदवारांनी अर्ज दाखल केली आहे तसेच उर्वरित उमेदवारांचा एक पॅनल होण्याची शक्यता सावाना वर्तुळात वर्तविण्यात येत आहे.

नानासाहेब बोरस्ते यांच्या नावाची फक्त चर्चा

सावानाच्या प्रांगणात आजच्या अखेरच्या दिवशी अध्यक्षपदासाठी माजी अध्यक्ष नानासाहेब बोरस्ते अर्ज करणार असल्याची चर्चा रंगली होती. सर्वांच्या तोंडी फक्त नानासाहेब फॉर्म भरणार एवढेच वाक्य होते. मात्र, जसजसा वेळ गेला तसतसा इतर उमेदवार अर्ज दाखल करू लागले तरीही नानासाहेब बोरासतेंनी ना फॉर्म घेतला ना भरला त्यामुळे त्यांच्या उमेदवारीची शेवटपर्यंत फक्त चर्चाच राहिली.

Related Stories

No stories found.