सावाना निवडणूक : संस्थेला गतवैभव प्राप्त करुन देणे हाच उद्देश - प्रा.फडके

सावाना निवडणूक  :  संस्थेला गतवैभव प्राप्त करुन देणे हाच उद्देश - प्रा.फडके

नाशिक | प्रतिनिधी Nashik

येत्या रविवारी नाशिकची सांस्कृतिक ओळख असलेल्या सार्वजनिक वाचनालय नाशिक ( Sarvajanik Vachnalaya , Nashik )या संस्थेची निवडणूक ( Election )होत आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दैनिक 'देशदूत'च्या कार्यकारी संपादक डॉ. वैशाली बालाजीवाले यांनी ग्रथालय भुषण पॅनलचे अध्यक्षपदाचे उमेदवार प्रा.दिलीप फडके( Prof. Dilip Phadke) यांच्याशी संवाद साधला

नाशिकच्या सांस्कृतीक चळवळीचा वारसा व वाचन संस्कृतीचे मुख्य केंंद्रबिंदू असलेले सार्वजनीक वाचनालय हे वाद विवादापासून मुक्त अशी सर्वसमावेशक संस्था असावी. लोकांना बरोबर घेेऊन सांस्कृतीक चळवळ गतीमान करुन संस्थेला गतवैभव प्राप्त करुन देणे हाच आमचा उद्देश असून त्यादृष्टीनेच ही निवडणूक लढवत आहोत, अशा शब्दात ग्रथालय भुषण पॅनलचे अध्यक्षपदाचे उमेदवार प्रा.दिलीप फडके यांनी आपली भूमिका विषद केली.

प्रा.फडके म्हणाले, सावाना हे नाशिकच्या सांस्कृतीक चळवळीचे मुख्य केंद्र असतांना गेल्या दहा वर्षात येथे आरोप- प्रत्यारोप गाजत आहे. वादच एवढे विकोपाला गेले की जे वाद सामंजस्याने मिटणे आवश्यक होते ते धर्मदाय आयुक्त व न्यायालयात जाऊ लागले. चुकीच्या मार्गानेे चांगल्या सभासदांना बाहेर काढले गेले. संवादाने व समन्वयाने वाद मिटणे गरजेचे असतांना त्याला भलतेच वळण दिले गेले. वाद मिटले पाहिजे, वाचन संस्कृती टिकली व वृध्दींगत झाली पाहिजे, या दृष्टीने आम्ही या निवडणुुकीकडे बघत आहोत. कोणावरही टिका करत नाही. फक्त आम्ही काय करणार हेच सांगत आहोत.

सावानासारख्या संस्थेत निवडणुकीत जातीयवादाचेे ओेंगळ दर्शन होत असल्याबद्दल चिंता व्यक्त करुन ते म्हणाले, संंस्था आता व्यापक झाली आहे. जात, पात, धर्म, राजकीय विचारांपलीकडे जाऊन विकास करणारे नेतृत्व आता सभासदांना हवे आहे.जातीपातीचे राजकारण करण्याचे हे ठिकाणच नाही. उलट येथून शहरातील इतर ग्रंथालय, वाचनालयांंना मदत व्हावी व शाळा, महाविद्यालयांना पुस्तके पुरविणारे ग्रंथालय व्हावेे. जर वाचक वाचनालयापासून दुरावत चालले असतील तर वाचनालयांना वाचकापर्यंंत जाणे गरजेचे आहे. त्यासाठी विविध उपक्रम व तंत्रज्ञानाची मदत घेेता येते व तसेच करण्याचा आमचा सर्वाचा प्रयत्न असेल.

या निवडणुकीतील आपल्या पॅनलच्या अजेंंड्याबाबत ते म्हणाले की, वाचनालयाचे डीजीटायझेशन अद्यावत करणे, ग्रंथालय उपक्रम राबवणे, परशुराम साईखेडकर नाटयगृह हेे नाशिकचे सांस्कृतीक विश्वाचे केंंद्र बिंदू करणे, नवीन पध्दतीने नाट्यगृहाची रचना करणे, या उद्देशाने आम्ही काम करणार आहोत. सावानाच्या पुढाकाराने शहरात सांस्कृतीक महोत्सव भरविणे, त्यात नाशिककरांना सहभाग करुन घेणे अशा प्रकारे नवीन मार्ग

अवंंलंबून सावानाला लोकाभिमुख करावे लागेल. अशा इच्छाशक्तीचेे सर्वसमावेशक नेतृत्व असावे. लोकाना जोडून घ्यावे. सर्वानां विश्वासात घेऊन काम केल्यास येथे खूप चांगले काम उभे राहु शकते,असे आम्हाला वाटते. सावनातील संग्रहालय प्रचलित व्हावे, नाशिक दर्शन बस येथे थांबली पाहिजे असा प्रयत्न आवश्यक आहे. सावाना समजून घेेतले पाहिजे. लोकांना बरोबर घेऊन हे सर्व करण्यासाठी ग्रंथालय भुषण पॅनेल यंदा मतदारांंसमोर जात आहे.

Related Stories

No stories found.