सावाना निवडणुकीसाठी कमालीचा उत्साह; पहिल्या तीन तासांत झाले 'इतके' मतदान

सावाना निवडणुकीसाठी कमालीचा उत्साह; पहिल्या तीन तासांत झाले 'इतके' मतदान

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

सार्वजनिक वाचनालयाच्या (Savana) निवडणुकीसाठी आज सकाळपासून मतदान सुरू आहे. 18 जागांसाठी मतदान (voting) होत आहे.

आज सकाळी 11 वाजेपर्यंतची आकडेवारी समोर आली असून आतापर्यंत एकूण 22 टक्के मतदान झाले आहे.

सावानात एकूण ६ हजार २०० मतदार असून त्यापैकी आतापर्यंत १ हजार ४०० मतदारांनी आपला निवडणुकीचा हक्क बजावला आहे.

खा. हेमंत गोडसे, आ. माणिकराव कोकाटे, वसंत गीते, अशोक मुर्तडक, विजय करंजकर, शाहू खैरे, शेफाली भुजबळ आणि माजी नगरसेविका हिमगौरी आडके, माजी नगरसेवक अजय बोरस्ते, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष रवींद्र पगार, आकाश पगार, कैलास मुदलियार, भाजप युवमोर्चा शहराध्यक्ष अमित घुगे, यांनीदेखील आपला मतदानाचा हक्क बजावला आहे.

वायडी बिटको गर्ल्स हायस्कूलमध्ये हे मतदान होत आहे. मतदारांनी शांतता राखत या ठिकाणी मतदान करण्याचे आवाहन देखील निवडणूक निर्णय अधिकारी यांनी केले आहे.

Related Stories

No stories found.