सातपूर जलशुद्धीकरण प्रकल्प धूळखात

सातपूर जलशुद्धीकरण प्रकल्प धूळखात

सातपूर । प्रतिनिधी Satpur

सातपूर मटण मार्केटजवळ (Satpur Meat Market) मनपातर्फे दहा वर्षांपूर्वी लाखो रुपये खर्च करुन दूषित पाणी प्रक्रिया प्रकल्प (Contaminated water treatment plant) (एसटीपी) प्लांट उभारण्यात आला आहे. मात्र तो सुरू होण्यापूर्वीच बंद झालेला असल्याने मनपाचे लाखो रुपये वाया गेल्याने याबाबत कोण लक्ष देणार, असा सवाल महादेवनगर जनसेवक संस्थेच्या वतीने उपस्थित करण्यात आला आहे.

सातपूर (satpur) येथे मटण मार्केट आहे. येथून घाण पाणी नदीपात्रात जात असते. या ठिकाणी कत्तलखान्यातील दूषित पाणी फिल्टर करुण नंदिनी नदित सोडले जाण्याच्या उद्देशाने हा प्रकल्प दहा वर्षापूर्वी उभारण्यात आलेला होता. मात्र प्रशासनाच्या दुर्लक्षाने या प्रकल्पाचा उद्देश फोल ठरल्याचा आरोप महादेवनगर जनसेवक संस्थेच्या वतीने उपस्थित करण्यात आला आहे.

हा प्रकल्पतातडीने पूर्ण करण्याची मागणी जनसेवक समितीने केली आहे. या जागे लगतच सार्वजनिक शौचालय (Public toilets) देखील आहे. त्याची अवस्था देखिल वाईट आहे. घाणेरडे व पालापाचोळा मोठ्या प्रमाणात साचलेला आहे. याठिकाणी मनपाचे स्वच्छता कर्मचारी गेल्या अनेक वर्षांपासून गेले नसल्याचे दिसून येत आहे. जलशुध्दिकरण प्रकल्प (Water purification project) केव्हा कार्यान्वित होणार?

यासाठी मनपा आयुक्तांना निवेदनही (memorandam) देण्यात आलेले आहे. या बाबत जागरुकता न दाखविल्यास महादेव नगर जनसेवक सा.संस्था मोठे आंदोलन (agitation) उभारणार असल्याचा इशारा महादेव नगर जनसेवक सा.संस्था सातपुर चे अध्यक्ष विजय अहिरे, उपाध्यक्ष भारत भालेराव, खजिनदार संजय तायडे यांनी पत्रकाद्वारे दिला आहे.

Related Stories

No stories found.