प्रभाग सभापतींनी घेतला विकासकामांचा आढावा

प्रभाग सभापतींनी घेतला विकासकामांचा आढावा

सातपूर | प्रतिनिधी | Satpur

सातपूर प्रभाग समिती सभापतीपदाचा पदभार मनसेचे नगरसेवक योगेश शेवरे (MNS corporator Yogesh Shevre) यांनी स्वीकारला. पदभार स्वीकारताच त्यांनी अधिकार्‍यांची बैठक घेऊन विविध विभागाच्या कामांचा आढावा घेतला...

सातपूर प्रभागाच्या सभापतीपदी (Chairman of Satpur Ward) दुसऱ्यांदा नियुक्त झाल्यानंतर सभापती रवींद्र धिवरे (Ravindra Dhivare) यांनी आपल्या पदाचा पदभार योगेश शेवरे यांना सूपूर्द केला.

यावेळी माजी महापौर अशोक मुर्तडक, मनसे जिल्हाध्यक्ष दिलीप दातीर,अनंत सूर्यवंशी, माजी सभागृहनेते नगरसेवक सलिम शेख, नगरसेवक संतोष गायकवाड, मनसे शहराध्यक्ष अंकूश पवार, योगेश लभडे, सचिन सिन्हा, ज्ञानेावर बगडे, सोपान शहाणे आदी उपस्थित होते.

यावेळी पदग्रहणानंतर विभागीय अधिकारी नितीन नेर यांच्यासह विविध खात्यांच्या अधिकार्‍यांसोबत आढावा बैठक घेण्यात आली. त्यात पावसाळी कामांचा आढावा घेण्यात आला.

शहराच्या विकासावर भर

सभापतीपदाच्या दुसऱ्या कार्यकाळातही अल्प कालावधी मिळाला असला तरी मागील अनुभवामुळे शहराच्या विकासासाठी विशेष लक्ष देणार आहे. अधिकारी व नागरिकांमधील दुवा बनून काम करणार आहे.

- योगेश शेवरे, सभापती, सातपूर प्रभाग

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com