नियम तोडणाऱ्या नागरिक व्यवसायिकांवर सातपूर पोलिसांची दंडात्मक कारवाई

(प्रतिकात्मक छायाचित्र)
(प्रतिकात्मक छायाचित्र)

सातपूर l Saptpur (प्रतिनिधी)

विनामास्क फिरणाऱ्या आणि संचारबंदी नियमांचे उल्लंघन करणाऱ्या नागरिकांवर आणि वेळेच्या आत दुकाने बंद न करणाऱ्या दुकानादारांवर गेल्या काही दिवसात दंडत्माक कारवाई करण्यात आली.

संचार बंदी लागू असताना विना मास्क, विना कारण फिरणाऱ्या आणि फिजिकल डिस्टन्सचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली.

सातपूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत विनामास्क ३० नागरिकांकडून १५ हजार रूपये, सार्वजनिक ठिकाणी थुंकणे २ नागरिकांना २ हजार रूपये, फिजिकल डिस्टन्से उल्लंघन करणाऱ्या ४ नागरिकांकडून ४ हजार रूपये

संचारबंदीचे उल्लंघन करणाऱ्या तीन नागरिकांना २ हजार रूपये दंड वसूल करण्यात आला. वरिष्ठ निरीक्षक किशोर मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने ही कारवाई केली.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com