गॅस पाईपलाईनच्या कामामुळे सातपूर कॉलनी रस्ता बंद

गॅस पाईपलाईनच्या कामामुळे सातपूर कॉलनी रस्ता बंद

सातपूर | Satpur

शहरात पाइपलाइनद्वारे गॅस वितरणाची योजना आखण्यात आली असून, त्यासाठी आवश्यक असणारी पाईपलाईन यंत्रणा उभारण्याचे काम गतीने सुरू आहे.

या पाइपलाइनच्या कामामुळे सातपूर कॉलनी चा संपर्क मुख्य रस्त्याची सुटला असून पपया नर्सरी मार्गानेच वाहतूक करण्याचे नियोजन सुरू झाले आहे.

सातपूर कॉलनी मध्ये जाण्यासाठी श्रीराम चौक मध्यवर्ती चौफुली असून, या चौफुलीवर रस्त्याच्या मधोमध खोदकाम करून पाईपलाईन टाकण्याचे काम सुरू असल्याने सातपूर कॉलनी अशोक नगर कडे जाणारा रस्ता बंद झाला आहे. त्यामुळे आता वाहनचालकांना पपया नर्सरी चौफुली वरून फिरून सातपूर कॉलनी मध्ये जावे लागणार आहे.

हे काम तातडीने आणि शीघ्र गतीने पूर्ण करावे अशी मागणी सातपूर कॉलनी येथील नागरिकांकडून केली जात आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com