चांगल्या कामाचे आत्मसमाधान : खा. गोडसे

चांगल्या कामाचे आत्मसमाधान : खा. गोडसे

देवळाली कॅम्प । वार्ताहर Devlali Camp

काम कोणतेही असो, त्यासाठी प्रामाणिक प्रयत्न आणि पाठपुरावा हवा. तसे झाले तर ते काम निश्चितपणे मार्गी लागते व त्याचा मिळणारा आनंद वेगळाच असतो, असे प्रतिपादन खा. हेमंत गोडसे ( MP Hemant Godse ) यांनी केले.

लोकसेवा आयोगाचे परीक्षा केंद्र नाशिक ( UPSC Exam Center- Nashik ) येथे मंजूर करून आणल्याबद्दल खा. गोडसे यांचा एसव्हीकेटी महाविद्यालयात सत्कार आयोजित करण्यात आला होता. यावेळी खा. गोडसे बोलत होते. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. विजय मेधणे होते. व्यासपीठावर माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष खंडेराव मेढे, स्थानिक व्यवस्थापन समिती सदस्य आबासाहेब बोराडे, सुधाकर गोडसे, धनराज बोराडे, सुभाष खालकर, प्रशांत धिवंदे, संजय हांडोरे होते.

यावेळी खा. गोडसे म्हणाले की, लोकसेवा आयोगाचे केंद्र नाशिकला सुरू होण्यासाठी चार वर्ष पाठपुरावा केला. आयोगाचे अधिकार्‍यांनी केलेले सहकार्य व आपली अंतकरणापासूनची तळमळ यामुळे हे शक्य झाले. या केंद्रामुळे नाशिकसह धुळे, जळगाव, नंदुरबार, अहमदनगर येथील विद्यार्थ्यांचा मोठा फायदा होणार आहे.

प्राचार्य डॉ. मेधणे यांनी म्हणाले की, जागरूक लोकप्रतिनिधीमुळे अशा गोष्टी मार्गी लागत असतात. तरुण पिढीच्या उज्वल भवितव्यासाठी हे केंद्र अतिशय महत्वाचे ठरणार असल्याचे त्यांनी सांगितले. प्रास्ताविक शिवाजी हांडोरे, सूत्रसंचालन सविता आहेर, आभार वैभव पाळदे यांनी मानले. याप्रसंगी उपप्राचार्य डॉ. शशिकांत भोज, शाम जाधव, सोपान एरंडे, रवी गोडसे, रायते काका आदी उपस्थित होते.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com