गावच्या एकजुटीमुळे निधी देण्यात समाधान: माजी आ.वाजे

भाटवाडी येथे विविध विकास कामांचे लोकार्पण
गावच्या एकजुटीमुळे निधी देण्यात समाधान: माजी आ.वाजे

सिन्नर । वार्ताहर Sinnar

सरकारच्या सर्व योजना काटेकोरपणे राबवणारे भाटवाडी (Bhatwadi) आणि घोरवड (Ghorwad) ही दोन गावे आहेत. भाटवाडी येथे झालेली कामे उत्कृष्ट दर्जाची आहेत. त्यामुळे निधी (fund) देताना समाधान वाटते, असे प्रतिपादन माजी आमदार राजाभाऊ वाजे (Former MLA Rajabhau Waje) यांनी केले.

भाटवाडी येथे विकास कामांच्या लोकार्पण (Dedication of development works) सोहळ्यात ते बोलत होते. पंचायत समिती सदस्य सुमन बर्डे (Panchayat Samiti member Suman Barde), उदय सांगळे, श्वेता पाचोरे, मनोज महात्मे, संजय लोणारे, अतुल पाचोरे, कैलास पाचोरे, उषा आंबरे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.

वाजे यांच्या हस्ते खंडेराव महाराज मंदिर सभामंडप, जलकुंभ कामाचे लोकार्पण करण्यात आले. तर भूमिगत गटार योजनेचे भूमिपूजन पार पडले. सभा मंडपासाठी खासदार हेमंत गोडसे यांनी तर भूमिगत गटार कामासाठी जिल्हा परिषद सदस्य वैशाली खुळे यांनी निधी उपलब्ध करून दिला आहे. ठक्कर बाप्पा योजनेतून जलकुंभ तयार करण्यात आला आहे.

नियोजनबद्ध विकास करणारे गाव म्हणून भाटवाडी गावचे नाव घ्यावे लागेल. कामाचा दर्जाही चांगला राखला आहे. पाणी पुरवठा (Water supply), स्मशानभूमीतील सुविधा, रस्ते (road) या कामांना क्रमानुसार निधी उपलब्ध केला. प्राधान्यक्रम ठरवून गरजेची कामे अगोदर केली. अशा पध्दतीचा नियोजनबद्ध विकास ग्रामस्थांनी करून घेतला. गावातील एकजूट वाखाणण्याजोगी आहेे. त्यामुळे निधी दिल्याचे समाधानही मिळत असून भविष्यात गावातील विकास कामांसाठी गावाच्या मागे भक्कमपणे उभे राहण्याचे आश्वासन माजी आ. वाजे यांनी दिले.

सांगळे यांनी भाटवाडी येथील कामांसाठी नेहमीच मोकळ्या हाताने मदत केल्याचे सांगितले. माजी आमदार वाजे आणि माजी जि. प. अध्यक्षा शीतल सांगळे यांच्या निधीतून एकास एक कामे उभी राहिली. त्यामुळे अनेक विकास कामे पूर्णत्वास गेल्याचे सांगितले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com