सटाणा तालुका वार्तापत्र : यात्रोत्सवांअभावी अर्थकारण विस्कळीत

सटाणा तालुका वार्तापत्र : यात्रोत्सवांअभावी अर्थकारण विस्कळीत

सटाणा । शशिकांत कापडणीस | Satana

करोना (corona) संसर्गाच्या पार्श्वभूमीवर देवमामलेदार श्री यशवंतराव महाराज (Devmamaledar Shri Yashwantrao Maharaj) यात्रोत्सवाची परंपरा सलग दुसर्‍या वर्षी देखील खंडीत झाल्याने भाविकांसह व्यापार्‍यांमध्ये निराशेचे वातावरण पसरले आहे. गत दोन वर्षापासून मंदावलेले अर्थचक्र देवमामलेदारांच्या यात्रोत्सवामुळे तरी वेगाने फिरू लागेल, अशी आशा व्यावसायिक बाळगून होते. मात्र वाढत्या संक्रमणामुळे यात्रोत्सवावरील बंदी शासनातर्फे कायम ठेवण्यात आल्याने यात्रोत्सवावर अवलंबून असलेल्या अर्थकारणास मोठा फटका बसला आहे.

बागलाण तालुक्यात (Baglan taluka) गत दोन वर्षापासून करोना (corona) प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर यात्रोत्सवाचे आयोजनास शासनातर्फे परवानगी मिळालेली नाही. त्यामुळे नामपूरची भवानी माता यात्रोत्सव (Bhavani Mata Yatra) असो की डांगसौंदाण्याची जलदुर्गा यात्रा असो. यांचे आयोजन होवू शकलेले नाही. दोधेश्वर (Dodheshwar), कपालेश्वरची (kapaleshwar) महाशिवरात्रीनिमित्त (mahashivratri) भरणारी यात्रा, अंबासन व भाक्षी येथील खंडोबा महाराजांची यात्रोत्सव ((khandoba maharaj yatra) असो की मांगीतुंगी (mangi-tungi) येथील महामस्तकाभिषेकनिमित्त भरणारी यात्रा असो यांचे आयोजन गत दोन वर्षात होवू शकलेले नाही.

त्यामुळे यात्रोत्सवात होणार्‍या आथिक उलाढालीवर वर्षाचे नियोजन ठरविणार्‍या गाव तालुक्यातील असो की इतर तालुक्यातील लहान-मोठ्या व्यावसायिकांचे अर्थकारण पुर्णत: विस्कळीत झाले आहे. त्यामुळे बंद पडलेले यात्रोत्सव व्यावसायिकांची चिंता वाढविणारी ठरले आहे. भिषण दुष्काळात भुकेने व्याकुळ झालेल्या सर्वसामान्यांना सरकारी खजिन्याचे वाटप करत आधार देणार्‍या व आपल्या कार्यकर्तृत्वाने देवत्वाला पोहचलेल्या श्री देवमामलेदार यशवंतराव महाराज (Devmamaledar Shri Yashwantrao Maharaj) यांचे सटाणा (satana) शहरातील मंदिर हे शासनात सहभागी असलेल्या अधिकार्‍याचे एकमेव मंदिर आहे.

ब्रिटीश काळानंतर अनेक स्थित्यंतरे होवून देखील प्रत्येक पिढीमध्ये देव मामलेदारांविषयी श्रध्देचा विषय आज देखील कायम असल्याचे राज्यातून दर्शनासाठी येणार्‍या भाविकांवरून लक्षात यावे. विशेषत: महाराष्ट्रात कोल्हापुरच्या महालक्ष्मीप्रमाणे महत्वपुर्ण स्थान असलेल्या शहरातील महालक्ष्मी (mahalakshmi) मंदिरातील मुर्तीची प्रतिष्ठापना देवमामलेदारांच्या हस्ते संपन्न झाल्याचा इतिहास आहे.

देवमामलेदारांच्या मंदिराचे नुतनीकरण (Renovation of the temple) करण्यात आले असून सद्यस्थितीत महाराजांच्या वास्तव्याची साक्षीदार असलेल्या ऐतिहासिक तहसील कचेरीत नगर परिषद (nagar parishad) व देवस्थानच्या सहभागातून महाराजांचे स्मारक निर्माण करण्यात येत आहे. दरवर्षी बागलाण तहसीलदार, नगराध्यक्ष व देवस्थानचे अध्यक्ष यांच्या हस्ते सपत्नीक महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त महापुजा संपन्न होते. महाराष्ट्रातील (maharashtra) पंढरपूरचा (pandharpur) विठुराया, जेजुरीचा (jejuri) खंडेराया, शिर्डीचे (shirdi) साईबाबा (saibaba), शेगावचे (shegaon) गजानन महाराज (gajanan maharaj) अशा स्वरूपात सटाण्यातील देवमामलेदारांचा नावलौकिक आहे. त्यामुळे दरवर्षी आरम नदीच्या तटावर तब्बल 15 दिवस यात्रोत्सव भरत असतो.

प्रत्येक यात्रोत्सवानिमित्त शहरालगत आरम नदी परिसरात होणार्‍या कुस्ती दंगलमध्ये राज्यातील नामांकित पहेलवानांचा सहभाग विशेष आकर्षण ठरत आले आहे. त्यामुळे कुस्ती पाहण्यासाठी नाशिकसह (nashik) इतर जिल्ह्यातून शौकीन मोठ्या संख्येने सटाण्यात हजेरी लावत असतात. यात्रेमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे पाळणे, विविध खेळ-खाद्यपदार्थांची दुकाने, भांडी, कापड, पादत्राणे, सौंदर्य प्रसाधनेसह इतर किरकोळ वस्तुंच्या दुकानी मोठ्या प्रमाणात लावल्या जातात. लहान बालकांसह युवक-युवती तसेच महिला, पुरूष भाविकांना देवमामलेदारांच्या दर्शनासह यात्रोत्सवाचे मोठे आकर्षण कायम राहिले आहे. त्यामुळे बागलाणच नव्हे तर मालेगाव (malegaon), देवळा (deola), कळवण (kalwan) आदी तालुक्यातील भाविक देखील यात्रोत्सवास येत असतात.

त्यामुळे बागलाण (baglan), मालेगाव (malegaon) तालुकाच नव्हे तर नाशिक (nashik), धुळे (dhule), जळगाव (jalgaon) आदी जिल्ह्यातील व्यावसायिक देखील मोठ्या प्रमाणात व्यवसायानिमित्त या यात्रोत्सवाला दरवर्षी आवर्जुन हजेरी लावत असतात. तब्बल 15 दिवस सुरू राहत असलेल्या या यात्रोत्सवामुळे कोट्यवधी रूपयांची उलाढाल होत असल्याने व्यावसायिकांना देखील समाधान मिळत असत. मात्र यंदा सलग दुसर्‍या वर्षी देखील देवमामलेदारांचा यात्रोत्सव स्थगित असल्याने व्यावसायिकांमध्ये निराशेचे वातावरण पसरले आहे. करोना संकटामुळे नियमित स्वरूपात असलेल्या व्यवसायांवर अगोदरच मंदिचे सावट आहे. यात्रा उत्सव व्यवसायाला आधार देण्याचे काम करतात परंतू बंदीमुळे या व्यवसायावर देखील गडांतर आले असल्याची खंत अनेक व्यावसायिकांनी बोलून दाखवली.

शहरासह गावाच्या अर्थकारणाला चालना देण्याचे काम यात्रोत्सवाच्या आयोजनाने होत आले आहे. परंतू दोन वर्षापासून देवमामलेदार असो की तालुक्यातील इतर शहर-गावातील यात्रोत्सव करोना निर्बंधामुळे शासनाच्या आदेशामुळे आयोजित होवू शकलेली नाही. यात्रोत्सवात होणार्‍या गर्दीमुळे संक्रमण वाढण्याची भितीचे कारण शासनातर्फे देण्यात आले आहे.

शासनाची भुमिका एकिकडे योग्य असली तरी दुसरीकडे मात्र विवाह सोहळे असो की इतर राजकीय-सामाजिक कार्यक्रम, सभा, बैठकांमधील ओसंडून वाहणार्‍या गर्दी पाहता या कार्यक्रमांमुळे विषाणूचे संक्रमण होत नाही कां?ं असा प्रश्न व्यावसायिकांसह भाविकांतर्फे उपस्थित केला जात आहे. एकिकडे कमीअधिक प्रमाणात इतर कार्यक्रम हेात असतांना गर्दीवर नियंत्रण प्रस्थापित करणार्‍या उपायोजना करण्यासह यात्रोत्सवाचे आयोजन व्हावे, अशी अपेक्षा व्यावसायिकांसह भाविकांतर्फे केली जात आहे.

दरवर्षी संपन्न होणारा देव मामलेदार यात्रोत्सव गेल्या दोन वर्षापासून होत नसल्यामुळे एकुण 15 दिवसाच्या कालावधीतील सुमारे 15 लाख रूपयांपर्यंत देवस्थानचे नुकसान होत असून यात्रोत्सवानिमित्त आयोजित होणारे विविध उपक्रम राबविणे देखील शक्य होवू शकलेले नाही. व्यावसायिकांचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. करोनाचे संकट संपुष्टात येणे गरजेचे आहे.

भालचंद्र बागड देवस्थान अध्यक्ष

मिठाई व इतर पदार्थ निर्मितीसाठी मोठ्या प्रमाणात कारागीरांचा सहभाग असतो. यात्रोत्सव रद्द झाल्यामुळे व्यावसायिकांसोबत अशा घटकांच्या कुटूंबियांवर देखील आर्थिक संकट ओढवले आहे. पंधरा दिवसांच्या यात्रोत्सवामुळे चांगला व्यवसाय होवून मोठा आर्थिक दिलासा मिळत होता. मात्र दोन वर्षापासून सर्वच यात्रा बंद असल्याने अर्थकारण संकटात सापडले आहे.

श्रीपाद कायस्थ हॉटेल व्यावसायिक

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com