समको बँक मृत्यूंजय योजना राबविणार

समको बँक मृत्यूंजय योजना राबविणार

सटाणा । प्रतिनिधी Satana

सटाणा मर्चटस् को.ऑप. बँकेच्या (Satana Merchants Co.Op. Bank) माध्यमातुन सभासदांच्या अपघाती व नैसर्गिक मृत्यूनंतर (After accidental and natural death) वारसांना आर्थिक मदत (Financial aid) देण्याच्या दृष्टीकोनातून मृत्यूंजय योजना (Mrityunjaya Yojana) राबिण्यात येणार असल्याची माहिती बँकेचे चेअरमन कैलास येवला यांनी दिली.

समको बँकेची वार्षिक सर्वसाधारण सभा (Annual General Meeting) ऑनलाईनव्दारे (Online) घेण्यात आली. या सभेत अध्यक्षस्थानावरून मार्गदर्शन करतांना चेअरमन येवला बोलत होते. आगामी काळात धमार्थ दवाखाना तसेच समको चॅरीटेबल ट्रस्टची स्थापना (Establishment of Samko Charitable Trust) करण्यात येणार असल्याचे यांनी यांनी सांगितले. सभेस व्हा. चेअरमन कल्पना येवला, संचालिका रूपाली कोठावदेे, संचालक पंकज ततार, जयवंत येवला, शरद सोनवणे, दिलीप चव्हाण, प्रविण बागड, प्रकाश सोनग्रा, जगदिश मुंडावरे, तुषार खैरनार आदी उपस्थित होते.

मागील सभेचे इतिवृत्त वाचन मुख्यकार्यकारी अधिकारी देविदास बागडे यांनी केले. देवमामलेदार देवस्थानचे अध्यक्ष भालचंद्र बागड यांनी समको बँकेेने सभासद व शहरवासियांच्या आरोग्य सेवेसाठी समको चॅरीटेबल ट्रस्ट निर्माण करण्याची सुचना केली. यावेळी दिलीप टाटीया, अशोक गुळेचा, महेश देवरे, काकाजी सोनवणे, अरविंद सोनवणे, किशोर कदम, राजकुमार सोनी, बिंदू शर्मा, मोतीलाल पारख, अरुण सोनवणे, रमेश येवला आदिंसह सभासद सहभागी झाले. प्रास्ताविक संचालक पंकज ततार व आभार प्रविण बागड यांनी व्यक्त केले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com