संमेलनाध्यक्षपदासाठी सासणेंचे नाव आघाडीवर!; ९४वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन

साहित्य संमेलन
साहित्य संमेलन

नाशिक l Nashik (प्रतिनिधी)

नाशिकला हाेणाऱ्या ९४व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी ज्येष्ठ साहित्यिक भारत सासणे यांचे नाव आघाडीवर असून, कृतिशील लेखक अनिल अवचट यांच्या नावाच्या चर्चा हाेत आहे.

या बाबतचा अंतिम निर्णय २४ जानेवारीलाच जाहीर केला जाणार आहे. त्याआधी १९ जानेवारीपर्यंत साहित्य महामंडळाच्या सर्व विभागीय कार्यालयांमधून अग्रणी साहित्यिकांची नावे पाठवली जाणार आहेत.

त्यानंतर २३ जानेवारीला सर्व विभागीय प्रतिनिधी आणि महामंडळाच्या अध्यक्षांच्या बैठकीत चर्चा आणि विचारविनिमय करुन निर्णय घेतला जाणार आहे. आधुनिक मराठी कथाकारांमध्ये भारत सासणे हे एक अग्रगण्य व महत्त्वाचे कथालेखक आहेत.

साहित्यिक अनिल अवचट यांच्या बहुआयामी व्यक्तिमत्त्वामुळेच त्यांच्या नावाला वाढता प्रतिसाद मिळत आहे. तर, रवींद्र शोभणे, जयंत नारळीकर यांच्या नावांचीही चर्चा आहे. तारा भवाळकर आणि मनोहर शहाणे यांची नावेदेखील चर्चेत आहेत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com