पावसासाठी महादेवाला साकडे
नाशिक

पावसासाठी महादेवाला साकडे

सर्वतीर्थ टाकेद येथील महिलांचा पुढाकार

Vilas Patil

Vilas Patil

टाकेद । टाकेद व परिसरातील वारकरी, महिला व ग्रामस्थांनी एकत्रित येऊन सर्वतीर्थ टाकेद येथे देवाला अभिषेक करून पडण्यासाठी साकडे घातले. एकीकडे करोनाचे संकट गंभीर होत असताना पाऊस पडत नसल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. यावर उपाय म्हणून पूर्वजांच्या परंपरेकडे शेतकरी वळले आहेत.

आज टाकेद व परिसरातील शेतकरी, ग्रामस्थ, महिला व वारकरी यांनी एकत्रित येऊन सर्वतीर्थावर जाऊन महादेवाला अभिषेक करत चांगला पाऊस पडण्यासाठी त्यांना साकडे घातले. यावेळी सर्वांनी नगर परिक्रमा करुन सर्व ग्रामदेवतांनाही अभिषेक करत पावसासाठी साकडे घातले.

यावेळी सरपंच ताराबाई बांबळे, उपसरपंच रामचंद्र परदेशी, ग्रामपंचायत सदस्य कविता धोंगडे, भास्कर महाले, निवृत्ती वारुंगसे, विलास परदेशी यांच्यासह महिला व ग्रामस्थ उपस्थित होते.

Deshdoot
www.deshdoot.com