गावहित साधणारा सरपंच हवा

लोहणेरचे माजी सरपंच भास्करराव पेरे पाटील यांचे प्रतिपादन
गावहित साधणारा सरपंच हवा

लोहणेर । वार्ताहर Lohner

सरपंच (Sarpanch) हा गावाच्या हिताचा विचार करणारा असला पाहिजे. शासनाच्या विविध योजनांची माहिती घेऊन त्याचा फायदा सर्वसामान्य जनतेला करून गाव विकास (Village development) साधने सहज सोपे असले तरी गावविकासासाठी शासनाचे कर भरणे गरजेचे असते.

त्यातूनच खरा ग्रामविकास (Rural development) होत असतो. ग्रामस्थांना सोयीसुविधा उपलब्ध करून देतांना रोजगारास पुरक उद्योग व्यवसाय (Complementary industry business) सुरू केल्यास ग्रामपंचायत विकासाला हातभार लागू शकतो, असे प्रतिपादन आदर्श ग्रामपंचायत पुरस्कार प्राप्त पाटोदाचे माजी सरपंच भास्करराव पेरे पाटील यांनी येथे बोलतांना केले.

येथील रुद्रयोग संस्थेतर्फे आयोजित ग्रामगौरव पुरस्कार वितरण सोहळ्यात (Gram Gaurav Award Ceremony) आदर्श व्यक्ती व ग्रामनिर्माण या विषयावर व्याख्यान देतांना प्रमुख अतिथी म्हणून पाटील बोलत होते. आ.डॉ. राहुल आहेर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. भाजप जिल्हाध्यक्ष केदा आहेर, यशवंत शिरसाठ, केदा काकुळते, कुबेर जाधव, नुतन आहेर, प्रशांत देवरे, धर्मा देवरे, केशरबाई अहिरे, कल्पना देशमुख, सरला जाधव, शांताबाई पवार आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

सर्वत्र पाणी दूषित झाले असून त्यामुळे रोगराई पसरते आहे. नागरिकांना शुद्ध व स्वच्छ पाणी पुरवठा मिळणे गरजेचे आहे. प्रदूषण वाढल्याने ऑक्सिजन निर्मितीसाठी झाडे लावणे गरजेचे आहे. त्यासाठी ग्रामपंचायतीने पुढाकार घेऊन उपलब्ध असलेल्या जागेवर झाडे लावली पाहिजे. असे आवाहन करत पाटील पुढे म्हणाले, मुलांच्या शिक्षणासाठी, तसेच गावातील वृद्ध व्यक्तीची सर्वतोपरी काळजी घेण्याबरोबर ग्रामपंचायतीने कर वसुली वर भर देत ग्रामविकास साधावा असेही त्यांनी शेवटी बोलतांना सांगितले. यावेळी आ.डॉ.राहुल आहेर, भाजपचे जिल्हा अध्यक्ष केदा आहेर, यशवंत शिरसाठ, केदा काकुळते, कुबेर जाधव यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

यावेळी रुद्रयोग संस्थेच्या वतीने कमलताई विश्वास देवरे (उमराणे), सीमा रामचंद्र हिरे (आघार) उत्कृष्ट सरपंच, उत्कृष्ट ग्रामसेवा योगिता दिनेश पवार (उपसरपंच भऊर), रवी बाबुराव ठाकरे (ठेंगोडा), पूनम सोनजे (ग्रामसेवक खुंटेवाडी), संभाजी देवरे ( ग्रामसेवक माळवाडी ), अनिल आहेर (मटाणे), उत्कृष्ट उदयोग: - समाधान चव्हाण ( लोहोणेर ), स्वप्नील पाटील ( वासोळ), दिनेश सोनार (खालप ),प्रियंका जोशी( शेती), आदर्श गाव ग्रामपंचायत वाजगाव , लोहोणेर आदींना पुरस्कार व प्रमाण पत्र देऊन गौरविण्यात आले.

कार्यक्रमाचे नियोजन रुद्रयोगसंस्थेच्या वतीने विशाल देशमुख, सुलतान शेख, नागेश निकम, मनोज देशमुख, महेश देशमुख, महेश भामरे, अनिल आहेर, प्रवीण आहिरे, आदित्य शेवाळे, आदींनी केले. कार्यक्रमास यावेळी धर्मा देवरे, शांताबाई पवार, कृष्णा जाधव, विशाल देशमुख, भाऊसाहेब पगार, नंदकिशोर शेवाळे, आदिनाथ ठाकूर, प्रियंका जोशी, पूनम पवार, रेश्मा आहिरे, सतीश देशमुख, प्रसाद देशमुख, रतीलाल परदेशी, रमेश आहिरे, योगेश पवार, बंडू परदेशी, रामकृष्ण हिरे, शिवाजी आहिरे, दिनेश पवार, संदीप खारे, अशोक देवरे आदीसह देवळा तालुक्यातील सरपंच, उपसरपंच, सदस्य, व ग्रामस्थ उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com