सरपंच आरक्षण जाहीर; सुरगाणा तालुक्यात महिला राज!

सरपंच आरक्षण जाहीर; सुरगाणा तालुक्यात महिला राज!

हतगड l Hatgad (लक्ष्मण पवार)

सुरगाणा येथील पंचायत समिती सभागृहात तालुक्यातील ६१ ग्रामपंचायत मधील सरपंच पदासाठी आरक्षण सोडत लहान मुलांच्या हस्ते चिठ्ठी काढून जाहीर करण्यात आली.

काढण्यात आलेल्या चिठ्ठी सोडतीत ३१ ग्रामपंचायत अनुसूचित जमाती महिला राखीव तर अनुसूचित जमाती प्रवर्ग निहाय आरक्षण खालील प्रमाणे.

अनुसूचित जमाती जनरल :1

डांगराळे

अनुसूचित जमाती महिला राखीव : 31

काठीपाडा, कोठूळे, गोंदूणे, घोडांबे, चिंचपाडा, जाहूले, ठाणगाव, नागशेवडी, पळसन, पोहाळी, प्रतापगड, बाऱ्हे, बिवळ, भवाडा, भवानदगड, भोरमाळ, मनखेड, मांगदे, माणी, माळेगाव, मोहपाडा, म्हैसखडक, रगतविहीर, राहुडे, रोंगाणे, रोकडपाडा, लाडगाव, वरंभे, वाघधोंड, हट्टी, हरण टेकडी

अनुसूचित जमाती करीता : 29

अलंगुण, अंबाठा, अंबोडे, उंबरठाण, उंबरपाडा (दि), करंजुल, कळमणे, कुकूडणे, कुकूडमुंडा, खिर्डी, खुंटविहीर, खोकरी, खोबळा, चिकाडी, डोल्हारे, बुबळी, बेडसे, बोरगाव, भदर, मांधा, मालगव्हाण, राशा, शिंदे (दि), सराड, साजोळे, हतगड, हस्ते, हातरुंडी, हेमाडपाडा.

या प्रमाणे आरक्षण सोडत जाहीर झाली आहे. त्यामुळे तालुक्यात महिला राज अवतरणार हे निश्चित.

यावेळी उपविभागीय अधिकारी विकास मीना, तहसिलदार किशोर मराठे, गटविकास अधिकारी रत्नाकर पगार, सभापती मनिषा महाले, उपसभापती इंद्रजित गावित, नायब तहसिलदार सुरेश बकरे, जनार्दन भोये, रामजी गावित, भिका राठोड, विजय घांगळे, मेनका पवार, भारती चौधरी, भास्कर चौधरी, हेमराज धुम, आनंदा झिरवाळ, सखाराम सहारे, वसंत बागुल, गोपाळ धुम, वसंत महाले, विजय देशमुख, तुळशिराम खोटरे आदींसह तालुक्यातील सरपंच उपसरपंच व नागरिक उपस्थित होते.

सुरगाणा तालुक्यातील ६१ ग्रामपंचायत मधील आरक्षण सोडत काढतेवेळी उपस्थित प्रांत विकास मीना. समवेत तहसिलदार किशोर मराठे, गटविकास अधिकारी रत्नाकर पगार, सभापती मनिषा महाले, उपसभापती इंद्रजित गावित, नायब तहसिलदार सुरेश बकरे.

महिलांना हक्काचे आरक्षण तर मिळाले मात्र त्यांना खऱ्या अर्थाने हक्क गाजविण्याचा अधिकार मिळालेला आहे का? ज्या दिवशी महिला स्वतःच निर्णय घेऊन काम करतील व त्या निर्णयामध्ये इतरांचा हस्तक्षेप असणार नाही. तोच खरा महिला आरक्षणाचा विजय ठरेल व त्याच वेळी महिला सक्षम व सबल झाल्या असे म्हणता येईल.

मंदाकिनी भोये, सभापती

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com