ग्रामविकासात सरपंच महत्वाचा घटकः मिसाळ

ग्रामविकासात सरपंच महत्वाचा घटकः मिसाळ

पेठ । प्रतिनिधी | Peth

गावचा सरपंच (sarpancha) हा राष्ट्रीय विकासातील (National development) अत्यंत महत्वाचा घटक असल्याने गावच्या विकासासाठी संघटीत होऊन

संयमाने आपले गार्‍हाने योग्य रितीने मांडणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन उपविभागीय अधिकारी गणेश मिसाळ (Sub Divisional Officer Ganesh Misal) यांनी केले. पेठ (peth) येथील नवनिर्वाचीत थेट सरपंचपदी निवडून आलेल्या राष्ट्रीय सरपंच संसदेच्या आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

सरपंचाचे अराजकीय स्वरूपात संघटन करणे, शाश्वत ग्रामविकासाच्या (Village development) प्रकियेत विविध उपक्रमांचे आयोजन करुन सहाय्यभूत करणेसाठी नाशिकचे विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे (Divisional Commissioner Radhakrishna Game) यांच्या संकल्पनेतून गावपातळीवर सक्षम सरपंच घडविण्यासाठी तालुकास्तरावर अश्या उपक्रमांची आवश्यकता असल्याचे निर्दशनास आल्याने एमआयटी - राष्ट्रीय सरपंच संसदेचे प्रमुख समन्वयक योगेश पाटील, सहसमन्वयक प्रकाश महाले, ग्रामविकासतज्ञ बाजीराव खैरनार,

नाशिक जिल्हा सहसंघटक रमेश थोरात यांनी पेठ येथे दादासाहेब बिडकर महाविद्यालयाच्या सभागृहात सरपंचाचे कार्यशाळेचे (workshop) आयोजन करण्यात आले. यावेळी सरपंचांना विविध विकास कामे (Development works) करताना येणार्‍या समस्यांचे कश्या प्रकारे निरसन करता येईल याबाबत तहसिलदार संदीप भोसले यांनी मार्गदर्शन केले. कृषी अधिकारी जयंत गारे यांनी गावपातळीवर सरपंचाच्या अखत्यारीत असणार्‍या विविध योजनांची माहीती दिली.

सरपंच संसदेचे तालुकास्तरीय कार्यकारीणीत अध्यक्षपदी हेमराज राऊत, समन्वयकपदी संजय वाघ तर संघटकपदी मोहन कामडी यांची सर्वानुमते निवड करण्यात आली . या कार्यशाळेत महिला सरपंचांची उपस्थितीही लक्षणीय होती. सुत्रसंचालन प्रकाश महाले यांनी तर आभार सरपंच संजय वाघ यांनी मानले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com