सारस्ते ग्रामपंचायत बिनविरोध

सारस्ते ग्रामपंचायत बिनविरोध

नाशिक | Nashik

जिल्ह्यात सुरू असलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत (Gram Panchayat Elections) कॉंग्रेसने (Congress) खाते उघडले असून जिल्हा नियोजन समिती सदस्य विनायक माळेकर (Vinayak Malekar) यांच्या नेतृत्त्वाखाली त्र्यंबकेश्वर तालुक्यातील (Trimbakeshwar Taluka) सारस्ते ग्रामपंचायतीची (Saraste Gram Panchayat) निवडणूक बिनविरोध पार पडली आहे...

या ग्रामपंचायत निवडणुकीत सरपंच पदासह सर्व सदस्यपदाच्या जागांसाठी एकेकच नामनिर्देशन पत्र दाखल झाल्याने ही निवडणूक बिनविरोध (Unopposed) झाली. यामध्ये सरपंचपदासाठी परशराम रामचंद्र मोंढे तर सदस्य पदासाठी विनायक माळेकर,सुरेश हरी गायकवाड,सोमनाथ शंकर चौधरी,अलका देविदास माळेकर,मोनाली प्रदिप माळेकर,सिता स्वप्नील माळेकर,मिनाक्षी जानकिराम गायकवाड यांनी नामनिर्देशन अर्ज दाखल केले.

दरम्यान, प्रत्येक जागेसाठी एकेकच अर्ज दाखल झाल्याने बिनविरोध निवडीचे सोपस्कार बाकी असून सारस्ते ग्रामपंचायतची निवडणूक बिनविरोध पार पाडल्याबद्दल माळेकर यांचे अभिनंदन होत आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com