उद्या सराफ बाजार बंद राहणार

उद्या सराफ बाजार बंद राहणार
सराफ बाजार

नाशिक | Nashik

केंद्र सरकारच्या (Central Government) एचयुआयडी या किचकट कर प्रणालीला विरोध म्हणुन नाशिकचा सराफ बाजार (Nashik Saraf Bajar Samiti) सोमवाारी ( ता. 23) बंद ठेवण्यात येणार आहे...

सराफ व्यावसायिकांनी एक दिवसाच्या बंदची हाक दिल्याने सहाजकीच लाखो रुपयांंची उलाढाल ठप्प होणार आहे.

सराफ असोसिएशनचे अध्यक्ष गिरीश नवसे (Girish Navase) म्हणाले की, गेल्या शुक्रवारी सभासदांची बैठक झाली. त्यात एचयुआयडी प्रणाली (HUID System) ला विरोधासाठी एक दिवसीय बंद पाळण्याचा निर्णय एकमुखाने घेण्यात आला.

सोन्याची शुध्दता व गुणवत्ता यासाठी हॉलमार्क कायदा आवश्यकच आहे, त्याचे सराफ व्यावसायीकांनी स्वागतही केले आहे. मात्र केंद्र सरकार पुन्हा एचयुआयडी प्रणाली आणुन सऱाफ व्यावसीयाांकांच्या व्यवसायावर गदा आणु पाहत आहे. त्याला सामान्य व्यावसायीकांंचा तीव्र विरोध आहे.

या कायद्याने व्यावसाय करणे कठीण झाले आहे. बंद यशस्वीतेसाठी किशोर वानखेडे, मेहुल थोरात, प्रमोेद चोक सी, कृष्णा नागरे, योगेश दंडागव्हाळ आदींसह शेकडो सराफ व्यावसायीक प्रयत्नशील आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com