नाशिक । Nashik

नाशिक जिल्ह्यासह भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या सप्तशृंगी देवीचे मंदिर उद्या (दि.३१) दिवसभर खुले राहणार आहे.

सरत्या वर्षाला निरोप आणि नववर्षाच्या स्वागतासाठी सगळे सज्ज झाले आहेत. या पार्श्वभूमीवर सप्तशृंगी मंदिर २४ तास खुले राहणार आहे. दरम्यान मंगळवार (दि.२९) रोजी पौर्णिमेनिमित्त सप्तशृंगी देवी ट्रस्ट च्या वतीने देवीच्या आभूषणांची मिरवणूक काढण्यात आली. यावेळी ट्रस्टचे कार्यालयीन प्रमुख प्रकाश पगार व कर्मचारी उपस्थित होते.

३१ डिसेंबर च्या दरवर्षी सप्तशृंग गडावर भाविकांची गर्दी होत असते. त्यामुळे भाविकांची गर्दी लक्षात घेता त्या पार्श्व भूमीवर सप्तशृंगी देवी मंदिर उद्या २४ देवीच्या दर्शनासाठी खुले राहणार आहे. याबाबतची माहिती ट्रस्टचे व्यवस्थापक सुदर्शन गायतोंडे यांनी दिली आहे.