सप्तशृंगड भाविकांनी गजबजला

सप्तशृंगी गड
सप्तशृंगी गड

सप्तशृंगगड | Saptsrungigad

करोना लॉकडाऊन नंतर गडावर मंदिर उघडल्याने गडावर गजबज सुरु झाली आहे.

सप्तशृंगगडावर ट्रस्ट व रोपवे यांच्याकडून भाविकांना विविध सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या आहे.

करोनाच्या पार्श्वभूमीवर 18 मार्चपासून अर्धेशक्तीपीठ सप्तशृंगी मंदिर परिसर बंद करण्यात आले होते. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पाडव्याचा दिवशी धार्मिक स्थळ उघडण्याचे आदेश दिले.

त्याच अनुषंगाने सप्तशृंगी गडावरील रोपवे, सप्तशृंगी निवासिनी देवी ट्रस्ट, ग्रामपंचायत, पोलिस प्रशासन यांनी नियमावली केली आहे. दर्शनासाठी जाणार्‍या - येणार्‍या भाविक भक्तांसाठी सामाजिक अंतर ठेवण्याची व मास्क घालण्याची सूचना लावण्यात आल्या आहेत.

ठिकठिकाणी सॅनिटायझर टेम्परेचर गण, अनेक ठिकाणी सूचना फलक व कुटुंबांची नोंद ठेवल्यां जात आहे. दोन दिवसात अनेक भाविकांनी आणि पर्यटकांनी गडाला भेट दिली.

सप्तशृंगगडावर येणार्‍या भाविक भक्तांसाठी पहिली पायरी येथे सामाजिक अंतर ठेवून टेम्परेचर मशीन, सॅनिटायझरची व्यवस्था करण्यात आली आहे. मास्क लावूनच मंदिरात सोडले जात आहे. जागोजागी सुरक्षारक्षक तैनात करून भाविकांना मंदिरात प्रवेश देत आहोत.

- सुदर्शन दहातोंडे, व्यवस्थापक- देवी ट्रस्ट

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com