करोनामृतांच्या वारसांना सानुग्रह अनुदान

मंजुरीसाठी सक्षम प्राधिकरण जाहीर
करोनामृतांच्या वारसांना सानुग्रह अनुदान
USER

नाशिक । प्रतिनिधी Nashik

सर्वोच्च न्यायालयाच्या (supreme court) आदेशान्वये राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या (National Disaster Management Authority) मार्गदर्शक सूचनेनुसार कोविड-19 (covid-19) या आजाराने मयत (Deceased) झालेल्या व्यक्तींच्या वारसांना (heirs) सानुग्रह अनुदान (Sanugrah anudan) देण्यासाठी राज्यांना सूचित केले आहे.

त्याअनुषंगाने ऑनलाईन अर्ज (online apply) सादर करण्याची कार्यपध्दती शासनाकडून लवकरच अधिसूचित करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकारणाचे अध्यक्ष सूरज मांढरे (suraj mandhare) यांनी कळविले आहे. आपत्ती व्यवस्थापन (Disaster Management), मदत व पुनर्वसन विभागाचे (Relief and Rehabilitation Department) प्रधान सचिव यांच्या 12 ऑक्टोबर 2021 रोजीच्या निर्देशानुसार नाशिक जिल्ह्यातील (nashik district) कोविड-19 या आजाराने मयत झालेल्या व्यक्तींच्या वारसांना रुपये 50 हजार सानुग्रह अनुदान वितरीत करण्यात येणार आहे.

त्यासाठी सक्षम प्राधिकरण व प्राधिकरणाचा पत्ता : जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी कार्यालय, नाशिक जिल्हा नियंत्रण कक्ष (आपत्ती व्यवस्थापन प्रभाग), जुना आग्रारोड, नाशिक-1, येथे संपर्क साधावा. त्याचप्रमाणे www.nashik.gov.in या संकेतस्थळावर आणि व dmanashikgmail.com या ई मेलवर अधिक माहितीसाठी संपर्क साधण्यात यावा.

मदत व पुनर्वसन विभागाकडून सानुग्रह अनुदानासाठी ऑनलाईन अर्ज सादर करण्याची कार्यपद्धतीबाबत स्वतंत्रपणे कळविण्यात येणार आहे. तसेच सानुग्रह अनुदानाबाबत कोणत्याही खाजगी व्यक्ति किंवा संस्था यांना कागदपत्रे देवू नये, याबाबत पैशांची मागणी झाल्यास वरील नमूद पत्त्यावर तक्रार करण्याचे आवाहन देखील जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी केले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com