संत निवृत्तीनाथ मंदिर 'इतक्या' दिवस राहणार बंद

संत निवृत्तीनाथ मंदिर 'इतक्या' दिवस राहणार बंद

त्र्यंबकेश्वर | प्रतिनिधी |Trimbakeshwar

येथील संत निवृत्तीनाथ मंदिर (Sant Nivrittinath Temple) प्रसाद योजनेच्या (Prasad Yojana) कामामुळे १५ सप्टेंबरपर्यंत बंद राहणार असल्याची माहिती मंदिर समितीकडून देण्यात आली आहे...

केंद्र शासनाच्या प्रसाद योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात त्र्यंबकेश्वरच्या संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ मंदिर परिसराचा विकास होणार असून यात पंधरा कोटीची विकासकामे होणार आहे. यासाठी जुने बांधकाम (Construction) काढून जागा मोकळी करण्यात येणार आहे. तसेच पूर्वीची दर्शनबारी नुकतीच काढून टाकण्यात आली आहे. सध्या असलेली इमारत पाडण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे.

तसेच मंदिर बंद राहणार असले तरी नित्य नैमित्तिक पूजा पाठ आरती सुरू राहणार आहे. त्यामुळे पूजेत कोणताही खंड येणार नाही. आज ऋषिपंचमीला (Rishipanchami) आलेल्या भाविकांनी (Devotees)पायरी पासूनच दर्शन घेतले. तर गेट जाळी बंद करण्यात आली असून प्रवेशद्वारावर सूचना फलक लावण्यात आला आहे.

दरम्यान, पंधरा दिवस मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय धर्मदाय आयुक्त कृती प्रशासन समितीकडून घेण्यात आल्याची माहिती समितीचे भाऊसाहेब गंभीरे (Bhausaheb Gambhire) यांनी दिली. तर सहाय्यक धर्मदाय आयुक्त राम लीप्ते (Charity Commissioner Ram Lipte) नगरपालिका मुख्याधिकारी संजय जाधव (Sanjay Jadhav) पोलीस निरीक्षक रणदिवे यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com