त्र्यंबकेश्वर : दोन बसमध्ये ४० वारकऱ्यांसह होणार पालखीचे प्रस्थान

संत निवृत्तीनाथ महाराज समाधी सोहळा; प्रशासकीय समितीकडून पूजा
त्र्यंबकेश्वर : दोन बसमध्ये ४० वारकऱ्यांसह होणार पालखीचे प्रस्थान

त्र्यंबकेश्वर | वार्ताहर

आज मंगळवारी (दि ०६) श्री संत निवृत्तीनाथ महाराज समाधी सोहळा भक्ती पुर्ण वातावरणात साजरा झाला. लॉकडाऊनमुळे वारकरी भाविकांसाठी मंदिर बंद असल्याने मोजक्या भक्तांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला....

दरवर्षी या दिवशी हमखास पाऊस असतो मात्र यंदा पावसाने दडी दिली असल्याने सगळ्यांच्या नजरा आकाशाकडे खिळल्या आहेत.

शिवस्वरूप ब्रह्मगिरीच्या पायथ्याशी पुष्करणी नदीच्या काठी वद्य 12 शके 1216 मध्ये त्र्यंबकेश्वरला संत निवृत्तीनाथ महाराजांनी श्री हरी पांडुरंगाच्या साक्षीने संजीवन समाधी घेतली.

तेव्हापासून दरवर्षी या मंदिरात तिथीनुसार समाधी सोहळा साजरा होतो. यावेळी मंदिराच्या भोवती कुंकवाचा सडा टाकण्यात आला . गुलाब पुष्प तुळस वाहण्यात आली. फुलांची उधळण करण्यात आली.

संत निवृत्तीनाथांचे समाधीचे अभंग म्हणण्यात आले. संत निवत्तीनाथ महाराज समाधी पूजन पुजारी योगिराज गोसावी ,साचीता नंद गोसावी यांनी पूजन केले.

पूजेत ज्येष्ठ वारकरी आचार्य रामकृष्ण महाराज लहवितकर, सह धर्मदाय आयुक्त के एम सोनवणे, अॅड भाऊसाहेब गंभीरे, नगरपालिका मुख्याधिकारी संजय जाधव, पो. नी. रणदिवे हे उपस्थित झाले होते.

या वेळी पालखी सोहळा मानकरी बाळकृष्ण महाराज डावरे, पुंडलिक थेटे सामील होते त्र्यंबकेश्वर पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.19 जुलैला बसने प्रस्थान होणार आहे. दोन बस मधून 40 वर वारकरी पंढरपूर वारी आषाढ वारी साठी रवाना होणार आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com