संत निवत्तीनाथ मंदिर विश्वस्त निवड कधी होणार?

संत निवत्तीनाथ मंदिर विश्वस्त निवड कधी होणार?

त्र्यंबकेश्वर | Trimbakeshwer

१५ महिने उलटून गेले तरी अद्याप विश्वस्त निवड झाली नसल्याने विश्वस्त कधी निवडणार याकडे जिल्ह्यातील वारकऱ्यांचे लक्ष लागले आहे. (News From Trimbakeshwar)

येथील संत निवृत्तीनाथ मंदिराच्या (Sant Nirvruttinath Temple) विश्वस्त समितीचा कालावधी मे २०२० मध्ये संपुष्टात आला. परंतु त्यानंतर जानेवारी २०२१ मध्ये नवीन विश्वसत निवडीसाठी जाहीरनामा काढण्यात आला. पुढे १८७ इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या पण प्रत्यक्षात उमेदवार निवडले गेले नाही. या मुलाखती रद्द झाल्या. (Vishwasth Candidates Interviews)

पुन्हा नवीन जाहीरनामा काढून मुलाखती वेळा पत्रक प्रसिध्द झाले. त्यानंतर करोना प्रादुर्भावामुळे मुलाखती घेण्यात आल्या नाही. मधल्या काळात धर्मदाय आयुक्त कृत प्रशासक मंडल समिती या मंदिरावर नेमण्यात आले.

मागील विश्वस्त मंडळ मुदत सपून आता जवळपास १५ महिने होवून ही नवीन विश्वस्त मंदिरावर नेमलेले नाही त्यामुळे त्यावेळी इच्छुक वारकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

आता विश्वस्त मंडळासाठी कधी मुलाखती होणार व कधी निवड होणार याकडे वारकऱ्यांच्या लक्ष लागून आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com