संत निवत्तीनाथ महाराज पालखी प्रस्थान तयारी

संत निवत्तीनाथ महाराज पालखी प्रस्थान तयारी

चाळीस वारकऱ्यांची यादी तयार !

त्र्यंबकेश्वर । Trimbakeshwer

संत निवत्तीनाथ महाराज पालखी (Sant Nivruttinath Maharaj Palkhi) प्रस्थान १९ जुलै रोजी पहाटे ५ वाजता संत निवृत्तीनाथ मंदिरा (Sant Nivruttinath Mandir) पासून होणार आहे. चाळीस वारकरी भाविक (Fourty Devotees) २ एस. टी. बसेस (ST Buses) मधून रवाना होणार आहेत. यात सामील होणारे वारकऱ्यांची यादी तयार करण्यात आली आहे.

दरम्यान तत्पूर्वी या सर्व वारकऱ्यांची RTPCR चाचणी (RTPCR test) करण्यात येणार आहे. यामध्ये मानाच्या वारकरी दिंडीतील (varkri Dindi) ३२ व प्रशासन मंदिराचे ०८ अशी चाळीस जणांची यादी असल्याचे समजते. या प्रवासासाठी शिवशाही बस (Shivshahi Bus) मिळावी यासाठी समितीचे प्रयत्न सुरू आहे.

पालखी सोहळा कार्यक्रम

पालखी प्रस्थानच्या दिवशी पालखी मंदिरापासून पहाटे साडेपाच पर्यंत कुशावर्त तीर्थ (Kushavart Tirth) येथे येईल. अभिषेक स्नान देवाला होईल, नगरपालिका नगराध्यक्ष स्वागत करतील. त्यानंतर सकाळी सहा वाजता त्र्यंबकेश्वर (Trimbakeshwer) मंदिरापासून पंढरपूरकडे (Pandharpur) प्रस्थान करेल.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com