नाथांची पालखी जाणार विठुरायांच्या भेटीला!

त्र्यंबकेश्वरातून पन्नास वारकऱ्यांना परवानगी
नाथांची पालखी जाणार विठुरायांच्या भेटीला!

नाशिक । Nashik

पंंढरपूरच्या आषाढी एकादशी वारीेसाठी राज्य शासनाने दहा मानाच्या पालख्यांना पंंढरपुर मध्ये विठ्ठल मंदीरात येण्यास परवानगी दिली असुन त्यात त्रंबकेश्वर येथील श्री. संत निवृत्तीनाथ महाराज पालखीचाही समावेेश आहे.

त्यामुळे नाशिक मधील पन्नास वारकऱयांचा वारीचा मार्ग मोकळा झाला आहे.मात्र सर्व नियम पाळुन यंदा तरी पायी वारीला परवानगी द्यावी. अशी समस्त वारकऱ्यांची मागणी होती. ती अमान्य झाल्याने दुधाची तहान ताकावर भगवीण्याची वेळ आली आहे.

याबाबत अधीक माहीती आषाढी एकादशी एक महीन्यावर येऊन ठेपल्याने यंदा शासन वारीला परवानगी देते की नाही, याकडे राज्यभरातील वारकऱ्यांचेलक्ष्य लागले होते. आज उपमुख्यमंंत्री अजीत पवार यांच्याशी झालेल्या चचेर्र्नंंतर दहा मानाच्या पालख्यांंना परवानगी मिळाली. मुख्य ज्ञानेश्वर मांऊलींच्या् पालखीत शंभर जणांना परवानगी आहे.

इतर नऊ पालख्यांत प्रत्येक 50 जणांंना परवानगी दिली जाणार आहे. नाशिकच्या पालखीचे दरवर्षी वटपौर्णिमेला प्रस्थान होते. विविध ठिकाणी मुक्काम करत पंंढरपुरला जाते. मात्र आता दोन वाहनातुन 50 वारकरी पंंढरपुरला जातील.

तो निर्णय निवृत्तीनाथ मंंदीर प्रशासक घेतील. मात्र प्रशाासकांनी 50 वारकऱयांंची निवड करतांना जे खरोखर वर्षांनुवर्ष पर्यायी वारी करतात अशा तळमळीच्य वारकऱ्यांना त्यात समवीष्ट करावे, अशी अपेक्षा वारक़ऱयांंनी व्यक्त केली आहे.

यंदा करोना बाबतचे निर्बंंध काही अंशी शिथील झाल्यानंतर किमान सर्व नियम काटेकोर पाळुुन पायी वारीस परवानगी मिळेल अशी अपेक्षा होती मात्र दहाच मानाच्या पालख्यांंनाच परवानगी दिल्याचे पाहुन आशा मावळली, अशी खंत ज्येष्ठ वारकरी पुंंडलीकराव थेटेे यांनी व्यक्त केली.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com