संसरीचा संकेत शिंदे पहिल्याच प्रयत्नात आयईएस

देशात बारावे स्थान
संसरीचा संकेत शिंदे पहिल्याच प्रयत्नात आयईएस

देवळाली कॅम्प । Deolali Camp

वयाच्या 22 व्या वर्षी इच्छाशक्ती व जिद्दीच्या जोरावर संसरी येथील संकेत वसंत शिंदे याने केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या इंडियन इंजिनियअर सर्व्हिसेस या परीक्षेत घवघवीत यश संपादन करतांना देशात १२ व्या स्थानी येण्याचा पराक्रम केला आहे.

वडील वसंत शिंदे कॅन्टोमेन्ट हायस्कूलमध्ये शिक्षक असलेल्या संकेत ने देवळाली कॅम्प येथील डॉ.गुजर सुभाष हायस्कूल मध्ये प्राथमिक व माध्यमिक शिक्षण पूर्ण करून पुण्याच्या सिंहगड येथील काॅलेज ऑफ इंजिनिअर मधून विशेष प्रावीण्यासह पदवी मिळवली.

स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून काहीतरी वेगळे करण्याची मनीषा बाळगून असलेल्या संकेत ने आयईएस ही परीक्षा देताना वस्तूनिष्ठ परीक्षा, वर्णानात्मक परीक्षा, कठीण अशी मुलाखत अशा तीन टप्प्यावर स्पर्धेला सामोरे जाताना लाखो विद्यार्थ्यांमध्ये यशाला गवसणी घातली आहे.

संकेत सध्या भाभा अनुसंधान केंद्र, मुंबई येथे शास्त्रज्ञ म्हणून कार्यरत आहे. आपल्या यशा बद्दल बोलताना त्याने सांगितले की स्पर्धा स्पर्धेतील यश मिळविण्यासाठी अभ्यासात सातत्य,एकाग्रता,महत्वाकांक्षा हेच महत्त्वाचे असते.

आपण इंजिनिअरींगच्या तिसऱ्या वर्षापासून स्पर्धा परीक्षेची सुरूवात केली होती. आपल्या यशात आई, वडील,गुरुजन यांचा मोठा वाटा आहे,त्याचे यशाबद्दल खा.हेमंत गोडसे,कॅन्टोमेन्ट सीईओ अजयकुमार,शंकर एज्युकेशन सोसायटीचे सचिव रतन चावला, सुरेश कदम, चंद्रकांत गोडसे, सरपंच विनोद गोडसे सह अनेकांनी अभिनंदन केले.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com