आगामी निवडणुकीत भगवा फडकवण्यासाठी सज्ज व्हा : संजय राऊत

नाशिकच्या शिवसेना पदाधिकाऱ्यांकडून खा. संजय राऊत यांचे अभीष्टचिंतन
आगामी निवडणुकीत भगवा फडकवण्यासाठी सज्ज व्हा : संजय राऊत

नाशिकरोड | दिगंबर शहाणे | Nashikroad

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (Shivsena Uddhav Balasaheb Thackeray) गटाची मुलुख मैदान तोफ आणि पक्षप्रमुखांचे उजवे हात म्हणून ओळखले जाणारे अष्टपैलू व्यक्तिमत्व खा. संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या वाढदिवसानिमित्त मुंबईला (Mumbai) जाऊन नाशिकच्या शिवसेना पदाधिकाऱ्यांनी त्यांचे अभीष्टचिंतन केले...

अभीष्टचिंतन करणाऱ्यांमध्ये जिल्हा संपर्कप्रमुख भाऊसाहेब चौधरी, सहसंपर्कप्रमुख दत्ता गायकवाड, जिल्हाप्रमुख विजय करंजकर, महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर, नाशिक महापालिकेचे माजी विरोधीपक्षनेते अजय बोरस्ते, डी. जी. सूर्यवंशी आदींचा समावेश होता.

40 आमदारांनी गद्दारी करून पक्ष सोडला तरी नाशकात मात्र त्याची विशेष झळ बसू न दिल्याबद्दल राऊत यांनी नाशिकच्या शिवसेना पदाधिकाऱ्यांचे तोंडभरून कौतुक केले आणि अशीच एकजूट कायम ठेवून उद्धव ठाकरे यांचे हात बळकट करा,असे राऊत यांनी सांगितले.

नाशिकला मी लवकरच भेट देईन आणि असे सांगून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत सर्वत्र पक्षाचा भगवा फडकवण्यासाठी सज्ज राहा असेही राऊत यांनी सांगितले.

आगामी निवडणुकीत भगवा फडकवण्यासाठी सज्ज व्हा : संजय राऊत
ट्रक-मोटारसायकलचा अपघात; दुचाकीधारक गंभीर जखमी

नाशिकला पक्षाचा जो विस्तार झाला आणि आणि शिवसैनिकांची एकजूट टिकून राहिली ती आपल्या संघटन कौशल्यामुळे याची आठवण नाशिकच्या पदाधिकाऱ्यांनी राऊत यांना करून दिली.

आगामी निवडणुकीत भगवा फडकवण्यासाठी सज्ज व्हा : संजय राऊत
तिकीट बुकिंगबाबत रेल्वे मंत्रालयानं घेतला मोठा निर्णय

आपल्या दौरे तसेच घणाघाती भाषणाने शिवसैनिकांत कमालीचा उत्साह संचारतो. त्यामुळे नाशिकला वारंवार भेटी देत जा अशी विनंती नाशिकच्या पदाधिकाऱ्यांनी केली असता राऊत यांनी त्यास सकारात्मक प्रतिसाद दिला.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com