फाळके स्मारक सर्वांग सुंदर ठेवा : खा. राऊत

फाळके स्मारक सर्वांग सुंदर ठेवा : खा. राऊत

इंदिरानगर| वार्ताहर | Indiranagar

भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक, ज्यांनी देशाच्या चित्रपटसृष्टीला नावलौकिक मिळवून दिला, ज्यांच्या नावे भारतीय चित्रपट सृष्टीतला सर्वोच्च पुरस्कार दिला जातो, त्या दादासाहेब फाळके (Dadasaheb Phalke) यांचे स्मारकाचे वैभव देशात, देशाबाहेरसुद्धा अभिमान वाटेल, असे असले पाहिजे. देशातील, विदेशातील पर्यटकांची पावले या स्मारकाकडे वळायला पाहिजेत. पूर्ण देशाला ज्यांच्या मूळ प्रेरणा मिळते त्यांचे स्मारक सर्वांग सुंदर असले पाहिजे, असे मत शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी व्यक्त केले....

दोन दिवसीय नाशिक दौर्‍यावर आल्यानंतर आज दुपारी साडेचार वाजता त्यांनी पांडवलेण्याच्या (Pandavaleni) पायथ्याशी असलेल्या फाळके स्मारकाला (Phalke Smarak) भेट दिली. देशातील लोकांना अभिमान वाटेल चित्रपट सृष्टीतील लोकही या ठिकाणी येतील, राहतील, रमतील अशा प्रकारचे वैभव याठिकाणी असावे. मराठी माणसाच्या मनात दादासाहेब फाळके यांंच्याबद्दल असलेला आदर या वास्तूतून दिसावा, नाशिकचे (Nashik) सौंदर्य आणखी उंचावे, यासाठी आपण पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांना सुचवले आहे.

या जागेचा वापर चांगल्या रीतीने झाला पाहिजे, या ठिकाणी पर्यटक वाढले पाहिजेत, त्यासाठी नवनियुक्त मनपाचे आयुक्त रमेश पवार या ठिकाणी लक्ष घालतील, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त करताना त्यांनी मुंबईत केलेल्या कामाचे कौतुक केले.

वीस ते पंचवीस मिनिटे आतमध्ये फिरत असताना खा. राऊत यांनी शिवसेनेचे शहर प्रमुख सुधाकर बडगुजर (Sudhakar Badgujar) तसेच अजय बोरस्ते (Ajay Boraste), आयुक्त रमेश पवार (Ramesh Pawar) यांना काही सूचना देत या छोट्या काश्मीरला कसे चांगले बनवता येईल, यासाठी काही ठिकाणांची उदाहरणेही दिली.

हा परिसर नाशिक, महाराष्ट्र, देशाचा वैभव प्राप्त होऊ शकेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त करतानाच येथील दुरवस्था पाहून खंंतही व्यक्त केली. भारतीय चित्रपट सृष्टीला ज्यांनी दिशा दाखवली त्यांच्या कोणत्या आठवणी, खुणा जपल्या आहेत. सर्वाच्या नाशिककरांच्या दृष्टीने ऐतिहासिक पाश्वभूमीबरोबरच सांस्कृतिक, साहित्यिक भाषेतील, चित्रपट क्षेत्रात योगदान देणार्‍या सर्वोच्च व्यक्तींना त्यांनी केलेल्या कामाचे सर्व लोकांपर्यंत पोचवण्यासाठी प्रयत्न मनापासून होईल, यासाठी त्यांनी काही सूचनाही केल्यात आपण या ठिकाणी आल्यानंतर फाळके स्मारकामध्ये (Phalke Smarak) फिरायला येत असल्याचेही त्यांंनी आवर्जून सांगितले.

मोफत सर्व गोष्टी दिल्यास या ठिकाणचा मेंटेनन्स व्यवस्थित राहणार नसल्याने येणार्‍या पर्यटकांना (Tourists) तिकीट (Ticket) ठेवायलाच ठेवायला पाहिजे, असे मत त्यांनी व्यक्त केले.

राऊत यांनी चित्रपट हॉल, म्युझियम, वॉटर पार्क व इतर भागाची पाहणी केली. यावेळी आयुक्त रमेश पवार, मनपाचे उपायुक्त, इतर अधिकारी यांच्यासह शिवसेनेचे उपनेते सुनील बागुल, सुधाकर बडगुजर, अजय बोरस्ते, नगरसेवक सुदाम ढेमसे, नीलेश साळुंखे, मंदा दातीर, नाना पाटील, सुभाष गायधनी, अजिंक्य गीते उपस्थित होते.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com