त्र्यंबक नगरपरिषद
त्र्यंबक नगरपरिषद
नाशिक

त्र्यंबकेश्वर नगर पालिकेच्या मुख्याधिकारी पदी संजय जाधव

प्रवीण निकम यांनी बदली

Gokul Pawar

Gokul Pawar

त्र्यंबकेश्वर : त्र्यंबकेश्वर नगर पालिकेचे मुख्याधिकारी प्रवीण निकम यांची बदली झाली असून त्यांच्या जागेवर मुख्याधिकारी पदी संजय जाधव रुजू झाले आहेत.

त्र्यंबकेश्वरचे नगराध्यक्ष पुरुषोत्तम लोहगावकर, नगरसेवक स्वप्नील शेलार यांनी नवीन मुख्याधिकाऱ्यांचे स्वागत केले. दरम्यान त्र्यंबक नगरीची विशेष काळजी घेण्यात येईल असे मुख्याधिकारी जाधव यांनी यावेळी सांगितले.

मुख्याधिकारी जाधव हे अहेरी नगरपंचायत जि. गडचिरोली येथून त्र्यंबक येथे बदली झाली आहेत. तत्पूर्वी जाधव हे सिन्नर पालिकेत मुख्याधिकारी होते.

यावेळी उपनगराध्यक्षा माधवी भुजंग, शाम गंगापुत्र, सागर उजे इतर पालिकेचे कर्मचारी सोशल डीस्टन्स पाळत उपस्थित होते.

Deshdoot
www.deshdoot.com