Sheth B. N. Sarada School
Sheth B. N. Sarada School|सिन्नर : सारडा विद्यालयास सॅनिटायझर भेट
नाशिक

सिन्नर : सारडा विद्यालयास सॅनिटायझर भेट

माजी विद्यार्थ्याने केली मदत

Vilas Patil

Vilas Patil

सिन्नर । Sinnar प्रतिनिधी

येथील शेठ ब. ना. सारडा विद्यालयास माजी विद्यार्थी व माऊली इंजिनिअरींगचे संचालक विवेक वांद्रे यांनी नुकतेच करोनाच्या महामारीच्या पार्श्वभूमीवर सॅनिटायझर व सोडियम हायपो क्लोराईड भेट दिले.

शाळा माझी, मी शाळेचा या भावनेतून त्यांनी ही मदत केली. समाजात वावरत असताना समाजाचेही आपण काहीतरी देणे लागतो अशी शिकवण आपल्याला शाळेने दिली असून कर्तव्याच्या भावनेतून शाळेला, शाळेत शिकत असलेल्या विद्यार्थी मित्रांना मदत केली असल्याचे ते म्हणाले.

कोविड-19 या महामारीच्या पार्श्वभूमीवर शाळेच्या विद्यार्थ्यांची सुरक्षितता महत्त्वाची आहे. शाळा सुरू झाल्यानंतर वेळोवेळी सॅनिटायझर व सोडियम हायपोक्लोराईडची गरज भासणार आहे. वांद्रे यांनी ही गरज ओळखून केलेली मदत नक्कीच कौतूकास्पद असल्याचे शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष बापूसाहेब पंडीत म्हणाले.

संकटाच्या काळात माजी विद्यार्थ्याने मदतीला धावून येणे अभिमानास्पद असल्याचे प्राचार्य अनिल पवार यांनी म्हणत वांद्रे यांचे आभार मानले. यावेळी पर्यवेक्षक सुनील हांडे, कार्यकारी मंडळाचे सदस्य राहुल मुळे, अण्णा जाधव, आशुतोष अंदोरे, खेमराज जोशी, टिका जोशी, मनिषा गायकवाड उपस्थित होत्या.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com