अपघातात संगमनेरचे दोघे ठार
नाशिक

अपघातात संगमनेरचे दोघे ठार

अज्ञात वाहन धडक देऊन झाले फरार

Vilas Patil

Vilas Patil

सिन्नर । प्रतिनिधी Sinnar

नाशिक-पूणे महामार्गावरील बायपासवर पंक्चर झालेल्या ओम्नी कारला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने संगमनेर येथील दोन व्यापारी ठार झाल्याची घटना मंगळवारी (दि.११) रात्री १२ च्या दरम्यान घडली.

नाशिक येथून ही ओम्नी कार संगमनेरकडे परतत असताना सिल्व्हर लोटस् स्कूलसमोर पंक्चर झाली. त्यामुळे कारमधील संतोष देवराम आखाडे (40) रा. घूलेवाडी, संगमनेर व राजेंद्र नानासाहेब आखाडे (42) रा. तिरंगा चौक, संगमनेर यांनी कार रस्त्याच्या कडेला उभी केली.

स्टेपनी व जॅक घेऊन ते पंक्चर काढण्याच्या तयारीत असतांना अचानक आलेल्या अज्ञात वाहनाने कारसह दोघांनाही चिरडले व ते वाहन अंधाराचा फायदा घेऊन फरार झाले. अपघाताच्या वेळी झालेल्या आवाजाने आजूबाजूच्या रहिवाशांनी घटनास्थळी धाव घेतली.

मात्र, दोघांंचाही गंभीर जखमी झाल्याने जागेवरच मृत्यू झाला होता. त्यांच्या खिशातील आधारकार्ड व मोबाईलवरुन ओळख पटवण्यात आली. पोलीस हवालादार टीळे यांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह नगर परिषदेच्या दवाखान्यात नेले. तेथे आज (दि.12) शवविच्छेदन केल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले.

दरम्यान, मयत संतोष हे घुलेवाडी येथील प्रतिष्ठीत किराणा व्यापारी होते. तर मयत राजेंद्र यांचे बसस्थानकासमोर हॉटेल होते. दोघांच्याही अपघाती निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. बायपासवरील सुसाट वाहनांमुळे सिल्व्हर लोटस् समोर अपघातांचे प्रमाण वाढले आहे. या रस्त्यावर गतीरोधक बसवावेत अशी मागणी परिसरातील रहिवाशांकडून करण्यात येत आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com