... यामुळे लासलगावच्या संदीप पाटलांचा नासाने केला गौरव

... यामुळे लासलगावच्या संदीप पाटलांचा नासाने केला गौरव

लासलगाव । वार्ताहर Lasalgaon

लासलगाव येथील यशराज संदीप पाटील (Yashraj Sandeep Patil) यास हिमालयातील विक्रमी निरीक्षणांमुळे (Record observations in the Himalayas) नासाने (NASA) त्यास उदयोन्मुख ग्लोब सुपरस्टार (Emerging Globe Superstar) म्हणून घोषित केले आहे. सन 2021 च्या भारतातील पहिला पृथ्वी आणि अंतराळ संशोधन कार्यक्रम (Earth and Space Research Program) लडाख (Ladakh) येथे पार पडला.

याचा मुळ उद्धेश हा हिमालयाच्या सायंटिफिक (Scientific) रीतीने अभ्यास करणे, लडाख मधील काही ठिकाणी मार्स सारखे पृष्ठभाग असणे आणि लडाखच्या हिमालयातील जीवश्रृष्टी (Creatures) जी समुद्रसपाटीपासून 16 हजार फूट वरती काही तुरळक ठिकाणीच आढळलेली आहे आणि विशेष म्हणजे इथली इकॉसिस्टम (Ecosystem) ही दुसर्‍या इकॉसिस्टम पेक्षा खूप वेगळी आहे आणि त्यांची सहनशीलता सुद्धा खूप आश्चर्यजनक आहे.

जे कमी ऑक्सिजन (Low oxygen), आणि अति रेडिएशन (Excessive radiation), तुरळक पाऊस (low rain), निगेटिव्ह तापनमनात सुद्धा टिकेल अशी ही इकॉसिस्टम आहे. या संशोधनाबद्दल यशराजने नासा मेंटर्सला (NASA Mentors) कळवले. त्यांनी याची दखल घेत नासा च्या खास संशोधनाबाबत यशराजला मार्गदर्शन केले आणि नासाच्या पृथ्वी निरीक्षण मिशन (Earth observation mission) अंतर्गत ग्लोब प्रोग्रॅम (Globe program) यात यशराज सायंटिस्ट (Scientist) म्हणून काम करतो त्याचे खास ग्राउंड बेस्ड निरीक्षणे (Ground based inspection) प्रोटिकॉल्स (Protocols) सांगितले.

ज्याच्या सहाय्याने हिमालयाच्या पृष्ठभागावर चांगल्या रीतीने निरीक्षणे घेता येतील आणि यशराजने रेकॉर्ड ब्रेक ओबसर्वशन नासा/ग्लोब ला सबमिट केले. ज्यात ग्लोबला 1994 नंतर प्रथमच समुद्रसपाटीपासून 17500 फूट उंच लँड कव्हर (Land cover), क्लाऊड कव्हर (Cloud cover) आणि बायोडिव्हर्सिटी (Biodiversity) चे निरीक्षण आणि डेटा (data) मिळाला जो नासा च्या टेरा (tera) आणि एका उपग्रह (Satellite) च्या स्पेस डेटा सोबत तंतोतंत जुळला आणि इतिहासात हे हिमायलाच पहिला ग्लोब निरीक्षण नासा/ग्लोबला मिळाला.

यासोबतच यशराजने युनायटेड नेशन्स स्पेस कॉन्फरन्ससाठी (United Nations Space Conference) अर्ज दाखल केला. यात केवळ 37 टक्के अर्जदार निवडले गेले. ज्यापैकी केवळ 116 अर्जदार युनायटेड नेशन्स स्पेस जनरेशन फ्यूजन फोरमसाठी (United Nations Space Generation Fusion Forum) यूएन ग्लोबल डेलिगेट (UN Global Delegate) म्हणून उपस्थित राहू शकले. युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका (United States of America) येथे कोविड प्रतिबंधांमुळे यशराजने ऑनलाइन हजेरी लावली आणि पेंटागॉनचे यूएस स्पेस फोर्स डिरेक्टर ऑफ स्टाफ, युनिटेड स्टेट्स स्पेस फोर्स, व्हाईट हाऊसचे अधिकारी आणि अनेक उच्च प्रोफाइल व्यक्तींशी संवाद साधण्याची उत्तम संधी मिळाली

जिथे त्या सर्वांनी अलीकडील अंतराळ आणि कमी पृथ्वी कक्षावर चर्चा केली. या स्पेस कॉन्फरन्सचे काही भाग स्पेनमधील ला-पाल्मा बेटावर संयुक्त राष्ट्रसंघाच्या खगोलशास्त्रीय परिषदेत चर्चा करण्यासाठी नियोजित होते. जेथे चर्चा पुढे नेण्यासाठी केवळ यशराजची निवड करण्यात आली होती. यशराजला त्याच्या यशाबद्दल यूएस आणि स्पेन या दोन्ही देशांतील भारतीय दूतावासाने त्याचे कौतुक करून यापुढील काळात सहाय्याचे आश्वासन दिले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com