घोडांबेच्या उपसरपंचपदी संदीप गांगुर्डेंची बिनविरोध निवड

घोडांबेच्या उपसरपंचपदी संदीप गांगुर्डेंची बिनविरोध निवड

हतगड | प्रतिनिधी | Hatgad

सुरगाणा तालुक्यातील (Surgana Taluka) घोडांबे ग्रामपंचायतीवर (Ghodambe Gram Panchayat) मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने (Marxist Communist Party) सत्ता कायम राखत लाल बावटा फडकविला आहे...

थेट जनतेतून सरपंच निवड झाल्यानंतर आज निवडणूक निरीक्षक अधिकारी गायकवाड, ग्रामसेवक पवार आणि नवनिर्वाचित सरपंच माया येवाजी गांगुर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली उपसरपंचपदाची निवडणूक (Election of Deputy Sarpanch) पार पडली. यावेळी उपसरपंचपदासाठी संदीप मल्हारी गांगुर्डे यांनी एकमेव अर्ज दाखल केला. त्यानंतर दुपारी १२ वाजेपर्यंत कोणताही अर्ज न आल्याने त्यांना निवडणूक निरीक्षकांनी बिनविरोध निवडून आल्याचे घोषित केले.

दरम्यान, याप्रसंगी घोडांबे व रोटी गावातील अशोक भोये, बाळा भोये, शिवाजी गांगुर्डे, रोहिदास गांगुर्डे, रतन भोये, शंकर भोये, भरत भोये, पोपट पालवी, हेमराज पालवी यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. तसेच दोन्ही गावातील नागरिकांनी नवनिर्वाचित सरपंच व उपसरपंचांना शुभेच्छा दिल्या.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com