... म्हणून संदर्भचे अधिकारी पोहचले पालकमंत्र्यांच्या दारी

... म्हणून संदर्भचे अधिकारी पोहचले पालकमंत्र्यांच्या दारी
छगन भुजबळ

नाशिक । Nashik

गेल्या वर्षभरापासून नियमित वेतनापासून वंचित असलेल्या संदर्भ सेवा रुग्णालयातील (Sandarbh Seva Hospital) अधिकारी व कर्मचाऱ्यांनी पालकमंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांना निवेदन देत वेतन (Salary) प्रश्नांवर कायमस्वरूपी तोडगा काढण्याची विनंती केली आहे...

याबाबत पालकमंत्र्यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, राज्यातील आरोग्य विभागाच्या (Health Department) अंतर्गत असलेल्या नाशिक येथील विभागीय संदर्भ सेवा रुग्णालयात (Sandarbh Seva Hospital) कार्यरत असलेल्या वैद्यकीय अधिकारी (Medical officer) परिचारिका (Nurse) तंत्रज्ञ अशा विविध पदावर कार्यरत असलेल्या ७५० हून अधिक कर्मचाऱ्यांचे वेतन मागील फेब्रुवारीपासून झालेच नाही.

खासगी रुग्णालयांच्या स्पर्धेत अत्यल्प खर्चात उपचार होत असल्याने गरिबांना मोफत उपचार (Treatment) देत आहेत. मात्र, अहोरात्र सेवा देणाऱ्या उच्चशिक्षित डॉक्टर, पॅथॉलॉजिस्ट, विशेष तज्ञ, तंत्रज्ञ, परिचारिका, परिचरांना हक्काच्या वेतनापासूनच वंचित रहावे लागत असल्याचे या निवेदनात म्हटले आहे.

तसेच जिल्हा रुग्णालये, उपजिल्हा रुग्णालये, वैद्यकीय महाविद्यालये, ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टरांपासून परिचर,आशा वर्कर आणि आरोग्य संचालक (Health Director) उपसंचालक पदापर्यंत लाखो कर्मचाऱ्यांचे एकाच दिवशी वेतन होते. मात्र याच विभागाच्या अंतर्गत रुग्णालयाच्या डॉक्टर, कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठीच विलंब होत असल्याने कर्मचाऱ्यांकडून (Staff) नाराजी व्यक्त करण्यात आली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com