आलिशान गाडीतून सुरु होती चंदनाची चोरी; तिघांना बेड्या

आलिशान गाडीतून सुरु होती चंदनाची चोरी; तिघांना बेड्या

मालेगाव | प्रतिनिधी | Malegoan

तालुक्यात चंदनाची झाडे (Sandalwood trees) कापून पलायन करणार्‍या चोरट्यांच्या टोळीचा छडा लावण्यास अखेर तालुका पोलिसांना यश आले आहे...

15 किलो चंदनाचे सुमारे 27 हजार रूपये किंमतीचे लाकूड घेवून औरंगाबादकडे स्कोडा कारमधून फरार होत असलेल्या तिघा चोरट्यांना पोलिसांनी (Police) आज पहाटे चाळीसगाव फाटा (Chalisgoan Phata) येथे अटक करीत चंदनाच्या खोडांसह कार असा सुमारे 2 लाख 27 हजाराचा मुद्देमाल जप्त केला आहे.

मालेगाव तालुक्यातूनच (Malegoan Police) चंदनाची झाडे कापून सिल्लोड, जि. औरंगाबाद येथे तिघे संशयित चोरटे कारमधून पलायन करत होते. त्यांनी चंदन कुठून आणले याचे समाधानकारक उत्तर दिलेले नाही.

तिघांना दोन दिवस पोलीस कोठडीत (Police custody) ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहे. त्यामुळे चंदन चोरीच्या अनेक घटना उघडकीस येण्याची शक्यता तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक देविदास ढुमणे (Devidas Dhumne) यांनी पत्रकारांशी बोलतांना व्यक्त केली.

तालुक्यासह परिसरात गत अनेक दिवसांपासून शेतातील चंदनाची झाडे कापून चोरट्यांतर्फे लंपास करण्याच्या घटना सातत्याने घडत आहेत. मात्र पोलिसांना चोरट्यांचा सुगावा लागत नव्हता. गणेशोत्सवाच्या (Ganeshotsav) पार्श्वभूमीवर तालुका पोलिसांतर्फे चाळीसगावफाटा येथे नाकाबंदी करण्यात येवून वाहनांची तपासणी केली जात होती.

आज पहाटेच्या सुमारास नाकाबंदीवर असलेल्या एएसआय वाघ, बागुल यांच्यासह पोलीस पथकास भरधाव वेगात येणार्‍या स्कोडा कार क्र. एमएच 04 डीडब्ल्यू 494 चा संशय आल्याने पोलिसांनी ही कार थांबवत बाजूला उभी करण्याचे निर्देश दिले.

आलिशान गाडीतून सुरु होती चंदनाची चोरी; तिघांना बेड्या
गोदावरी प्रदूषण : राज्य सरकारला दणका; एक कोटीचा ठोठावला दंड

कारमध्ये बसलेल्या चालकांसह दोघांची पोलिसांनी विचारपूस केली असता तिघे जण उडवाउडवीची उत्तरे देवू लागल्याने पोलिसांनी कारची झडती घेतली असता एका गोणीत 10 किलो तर दुसर्‍या गोणीत 5 किलो असे सुमारे 15 किलो चंदनाचे खोड मिळून आले.

पोलिसांनी कारमधील गुलाब हुसेन (29), आरीफ खान शेर खान (23) व इरफान खान छोटे खान (तिघे, रा. सिल्लोड, जि. औरंगाबाद) यांना ताब्यात घेत त्यांच्याविरूध्द गुन्हा दाखल केला आहे.

Related Stories

No stories found.