प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत रस्त्यांच्या कामास मंजुरी

116.53 कि.मी. लांबीच्या 16 कामांना मंजुरी
प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत रस्त्यांच्या कामास मंजुरी
USER

नाशिक । प्रतिनिधी Nashik

दिंडोरी लोकसभा मतदारसंघाच्या खासदार तथा केंद्रीय आरोग्य व कुटुंबकल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवार (Union Minister of State for Health and Family Welfare Dr. Bharti Pawar ) यांच्या प्रयत्नातून प्रधानमंत्री ग्रामसडक योजने (Prime Minister Gramsadak Yojana )अंतर्गत पेठ, दिंडोरी, येवला, चांदवड, मालेगाव, निफाड व कळवण या तालुक्यांसाठी 7319.92 लक्ष इतक्या किमतीच्या 116.53 कि.मी. लांबीच्या 16 कामांना मंजुरी मिळाली आहे.

या रस्त्यांबाबत या परिसरातील नागरिकांची सातत्याने मागणी होत होती. ही कामे मंजूर झाल्यामुळे परिसरातील शेतकर्‍यांना याचा मोठ्या प्रमाणावर फायदा होऊन शेतमाल वाहतुकीच्या दृष्टीने मदत होणार आहे.

तालुकानिहाय रस्ते

नांदगाव तालुका - रस्ता लांबी 10.45 किलोमीटर (760.20लक्ष),

पेठ तालुका - तीळभाट ते गांगोडबारी शिंदे रस्ता 5.75 किलोमीटर (369.36 लक्ष),

दिंडोरी तालुका - इजिमा 198 गोंदेगाव ते खेडगाव बहादुरी रस्ता लांबी 8.850 किलोमीटर (558.15 लक्ष), राज्यमार्ग - 22 उमराळे हातनोरे रस्ता लांबी 13.500 किलोमीटर (947. 75 लक्ष),

येवला तालुका - जळगाव नेऊर पाटोदा रस्ता लांबी 6.87 किलोमीटर (348.09 लक्ष), कानडी ते ठाणगाव गुजरखेडे रस्ता लांबी 6.600 किलोमीटर (304.17), पिंपरी ते सावरगाव, तांदूळवाडी रस्ता लांबी 5.375 किलोमीटर (323.15 लक्ष),

चांदवड तालुका - चांदवड ते तळवाडे रस्ता सहा किलोमीटर (340.52 लक्ष),

मालेगाव तालुका - राममा - 03 ते कौळाणे चंदनपुरी रस्ता लांबी 11 किलोमीटर (523.90 लक्ष),

निफाड तालुका - दात्याने ते शिरसगाव रस्ता 6.200 किलोमीटर (414.19 लक्ष), नैताळे, कोळेवाडी, सोनेवाडी निफाड रस्ता लांबी 3.800 किलोमीटर (257.29 लक्ष), प्रजिमा - 27 भुसे ते महाळसाकोरे रस्ता लांबी 3.300 किलोमीटर (214.75 लक्ष), नांदूर-मध्यमेश्वर ते धरणगाव खडक रस्ता लांबी 5.320 किलोमीटर (335. 90 लक्ष ),

कळवण तालुका - साकोरे ते जिरवाडे नवीबेज रस्ता लांबी 12.500 किमी (861.34 लक्ष), खेडगाव ते रवळजी जयदर रस्ता लांबी 6.410 किलोमीटर (358.38 लक्ष), गोसराणे ते गंगापूर रस्ता लांबी 6. 600 किलोमीटर (375 .78 लक्ष).

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com