नाशिक । Nashik

माजी आमदार बाळासाहेब सानप स्वगृही परतल्याने त्यांच्या पक्षअंतर्गत विरोधकांना हा प्रवेश खटकला असून फक्त फडणवीस यांची नाराजी नको अोढून घ्यायला म्हणून काहिंनी हजेरी लावल्याचे बोलले जाते.

सानप यांच्या प्रवेशाने शहरात विस्कळीत झालेल्या भाजपला अच्छे दिन येतील असे त्यांचा समर्थक गुट सांगत अाहे. मात्र विरोधकांमुळे त्यांची वाट खडतर असल्याचे बोलले जाते.

मुंबई येथील पक्ष कार्यालयात माजी मुख्यमंत्री फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटिल, गिरिश महाजन यांच्या उपस्थितीत सानप यांचा वाजतगाजत प्रवेश झाला. मुंबईत प्रवेश सोहळा ठेवत सानप यांनी शक्तिप्रदर्शन करत पक्षातील विरोधकांना घाम फोडला.

गत विधानसभा निवडणुकीत सानप यांचे नाशिकपूर्वमधून तिकिट कापत अॅड. राहुल ढिकले यांना तिकिट देण्यात आले होते. त्यामुळे सानप यांनी पक्षाला सोडचिठ्ठि देत राष्ट्रवादी काॅग्रेस व नंतर शिवसेनेत प्रवेश केला. मात्र तेथे न रमल्याने सानप स्वगृही परतले. त्यामुळे ढिकले नाराज असून त्यांनी पक्षप्रवेश सोहळ्याकडे पाठ फिरवली.

दिवसभर ते नाॅट रिचेबल होते. आ. प्रा.फरांदे यांनी देखील हा सोहळा रुचला नाही. मागील टर्ममध्ये मंत्रिपद व महापालिके्च्या राजकारणावरुन यांचे बिनसले होते. तर महापालिका निवडणुकीत आ. सीमा हिरे यांच्या मुलीचे तिकिट कापल्याने त्या देखील सानप यांच्या प्रवेशाच्या विरोधात असल्याचे समजते. तर महापालिकेत काहि नगरसेवकांचा गट सानप विरोधात आहे.

मात्र दस्तुरखुद्द फडणवीस यांनी सानप यांचे कौतुक केल्याने बाकिच्यांना टाळ्या वाजविण्याशिवाय पर्याय नव्हता. आता आगामी काळात महापालिका निवडणुकीत सर्वांना बरोबर घेउन पुन्हा एकदा 'रामायण'वर कमळ फुलवण्याचे तगडे आव्हान त्यांच्या समोर असेल. त्यापुर्वी येत्या एक दीड महिन्यात स्थायी समितीपदी महाविकास आघाडिला धोबीपछाड देत पुन्हा स्थायी सभापती भाजपकडे खेचुन आणण्याचे आव्हान त्यांच्यासमोर असेल.