इगतपुरीत पाणीटंचाईचे सावट, समृद्धीच्या ठेकेदारांची मनमानी

इगतपुरीत पाणीटंचाईचे सावट, समृद्धीच्या ठेकेदारांची मनमानी

नाशिक | प्रतिनिधी

समृद्धी महामार्गाचे काम करणाऱ्या ॲपकॉम्प या कंपनीचा मनमानी कारभार समोर आला असून इगतपुरी तालुक्यातील नांदगाव सदो येथील ग्रामपंचायतिच्या अखत्यारीत असलेल्या पाझर तलावतून गेल्या 3 वर्षापासून अनधिकृतपणे 2 मोटरच्या सहायाने ही कंपनी उपसा करून पाणी वापरत आहे...

Title Name
कठोर भूमिका, कारवाई, अंमलबजावणी करा
इगतपुरीत पाणीटंचाईचे सावट, समृद्धीच्या ठेकेदारांची मनमानी

ग्रामपंचायत सदस्य भालचंद्र भागडे यांनी याबाबत विचारणा केली असता आम्ही ग्रामपंचायतीची परवानगी घेतली असल्याचे कंपनी सांगते. मात्र, प्रत्यक्षात तलाठी, सरपंच यांची कुठलीही परवानगी घेतली नसून ग्रामपंचायतीत या बाबतीत कुठलाच ठराव मंजूर नसल्याचे त्यांनी सांगताच आम्हाला वरून परवानगी मिळाली असून आम्ही पाणी भरणार असे कंपनी धमकावून सांगत असल्याचे भालचंद्र भागडे यांनी सांगितले.

या पाझर तलावात नांदगांव सदो, फांगुळगव्हण या गावातील शेतकरी बागायती शेती करतात. तसेच जनावरेही येथे पाणी पितात व वन्य प्राणी ही या पाण्याचा वापर करतात.

गावातील व्यक्तीने ग्रामपंचायतीची परवानगी घेऊन या तलावात मत्स्य व्यवसायासाठी 4 ते 5 लाख रुपयाचे मासे सोडले होते. ते सुद्धा मेले असल्याचे सांगितले जात आहे.

त्यामुळे या तरुणावर उपासमारीची वेळ आली आहे. तर जनावरांच्या व वन्य प्राण्यांच्या पिण्याच्या पाण्याचा व शेतकऱ्यांच्या शेतीचा प्रश्न निर्माण झाला आहे.

आता महिनाभर पुरेल एवढंच पाण्याचा साठा शिल्लक आहे. कंपनी एकत नाही म्हणून गावातील शिवशक्ती मित्र मंडळ, मनसे व बीजेपीच्या कार्यकर्त्यांनी तलावावर जाऊन पाणी चोरी करत असलेल्या या कंपनीच्या 2 मोटर पाण्यातून बाहेर काढून टाकल्या असून जर पुन्हा कंपनीने मनमानी केली तर पूर्ण गाव कंपनीच्या विरोधात उभा राहील असा इशारा दिला आहे.

यावेळी मनसे तालुकाध्यक्ष मुळचंद भगत, ग्रामपंचायत सदस्य भालचंद्र भागडे, भाजपा तालुका अध्यक्ष मयूर माळी,ज्ञानेश्वर भागडे, रमेश भागडे, शत्रुघ्न भागडे, भास्कर भागडे, भरत भागडे, बाबाजी भागडे, रवी भागडे,मनोज आडोळे, रघुनाथ आडोळे, श्याम भागडे, माणिक भागडे, गणेश मैले, देविदास राक्षे, राम भगत आदी उपस्थित होते.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com