समृद्धी महामार्गावरून पावसाचे पाणी थेट शेतात; पिकांचे नुकसान

समृद्धी महामार्गावरून पावसाचे पाणी थेट शेतात; पिकांचे नुकसान

सिन्नर । वार्ताहर Sinnar

तालुक्यातील शिवडे परिसरातून गेलेल्या समृद्धी महामार्गाचे पाऊस झाल्यानंतर महामार्गावरील पाणी शेतकर्‍यांच्या शेतात वाहून येत असल्याने मोठे नुकसान होत आहे. त्यामुळे परिसरातील शेतकर्‍यांना तत्काळ नुकसान भरपाई मिळण्याची मागणी शेतकर्‍यांनी तहसिलदारांना निवेदन देत केली आहे.

शिवडे परिसरातील गट नं. 544, 553, 545 याजवळून समृद्धी महामार्ग गेला असून जास्त पाऊस झाल्यावर महामार्गावरील पावसाचे पाणी या शेतशिवारात येत आहे. समृद्धी महामार्गाचे मुळे परिसरातील नैसर्गिक स्त्रोत बंद झाले आहे. परिसरातील नैसर्गिक स्त्रोतांमध्ये समृद्धी महामार्गाच्या बांधकामाचे दघड, माती येऊन अडकल्यामुळे पाणी वाहून जाण्यास अडचण निर्माण होत आहे.

त्यामुळे हे पाणी परिसरातील शेतशिवारात शिरत असून पिकांचे मोठे नुकसान होत आहे. त्यामुळे तहसिलदारांनी प्रत्यक्ष पाहणी करुन पाण्यामुळे नुकसान झालेल्या शेतकर्‍यांना नुकसानभरपाई मिळवून देण्याची मागणी शेतकरी विष्णु कचरु वाघ यांच्यासह इतर शेतकर्‍यांनी केली आहे. निवेदनाच्या प्रत जिल्हाधिकारी, उपमुख्यमंत्री कार्यालयाला पाठवण्यात आल्याचे माहिती वाघ यांनी दिली.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com