नाशिक जिल्हा मजूर फेडरेशनच्या संचालकपदी संपत सकाळे बिनविरोध

नाशिक जिल्हा मजूर फेडरेशनच्या संचालकपदी संपत सकाळे बिनविरोध

त्र्यंबकेश्वर | Trimbakeshwar

नाशिक जिल्हा मजुर फेडरेशन निवडणुकीत (Nashik Jilha Majoor Federation Election) संचालक पदासाठी त्रंबकेश्वर तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष संपत सकाळे (Sampat Sakale) यांची बिनविरोध निवड झाली आहे. मजूर फेडरेशनवर असलेला त्रंबकचा दबदबा सकाळे यांच्या निवडीने कायम राहिला आहे...

संचालकपदावर चौथ्यांदा सकाळे निवडून आले आहेत. आता केवळ अधिकृत घोषणा बाकी आहे. नाशिक जिल्हा मजूर संस्थांचा सहकारी संघ मर्यादित नासिकच्या त्र्यंबकेश्वर तालुका संचालक पदी संपत सकाळे यांचा एकमेव अर्ज राहिल्याने त्यांची निवड बिनविरोध झाली असे गृहीत धरले जात आहे, प्रशासकीय सोपस्कार पूर्ण झाल्यानंतर तशी घोषणा होईल.

नाशिक जिल्हा मजूर फेडरेशनच्या संचालकपदी संपत सकाळे बिनविरोध
घटस्फोटानंतर समांथा, नागा चैतन्य पुन्हा येणार एकत्र?

अशोक गोटीराम चव्हाण यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने सकाळेंचा एकमेव अर्ज राहीला, या बिनविरोध निवडीसाठी विनायक माळेकर, समाधान बोडके, रमेश पाटील, लक्ष्मण पाटील, हरीष गायकवाड, दिलीप चव्हाण, गणेश चव्हाण, अशोक चव्हाण, बापू सकाळे,अजित सकाळे यांनी प्रयत्न केले, यावेळी आमदार हिरामण खोसकर यांनी सकाळे यांचे अभिनंदन केले आहे. उर्वरित निवडणूक बिनविरोध व्हावी अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

नाशिक जिल्हा मजूर फेडरेशनच्या संचालकपदी संपत सकाळे बिनविरोध
संजय राऊत लवकरच नाशिक दौऱ्यावर

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com