त्र्यंबक उपनगराध्यक्षपदी समीर पाटणकर

त्र्यंबक उपनगराध्यक्षपदी समीर पाटणकर

त्र्यंबकेश्वर । Trimbakeshwer

त्र्यंबकेश्वर नगरपालिकेचे गटनेते समीर पाटणकर याची नगर पालिकेच्या उपाध्यक्षपदी आज यांची बिनविरोध निवड नगरसेवकांनी केली झाली.

धार्मिक परंपरा असलेले पाटणकर घराणे यांना प्रथमच असा राजकीय सन्मान मिळाला आहे. दोन्ही पदे सांभाळताना सर्वांना विश्वासात घेऊन त्रंबकेश्वरचा विकास करू असे समीर पाटणकर यांनी निवडीनंतर सांगितले

भाजपची एक हाती सत्ता असलेल्या त्रंबक नगरीत रोटेशन पद्धतीनुसार सागर उजे यांनी राजीनामा दिल्याने पाटणकर यांची निवड झाली सभेच्या अध्यक्षस्थानी असलेले नगराध्यक्ष पुरुषोत्तम लोहगावकर तसेच माजी नगराध्यक्ष सुरेश गंगापुत्र यांनी पाटणकर यांचे अभिनंदन केले. यापूर्वी खा गोडसे कड पाटणकर यांनी मोठा पुरावा प्रसाद योजनेसाठी केलेला आहे.

सभापती कैलास चोथे, स्वप्निल शेलार, शिल्पा रामायणे, भारती बदादे, त्रिवेणी तुंगार, कैलास भुतडा, माधवी भुजंग, भारती बदादे, अशोक घागरे, शामराव गांगापुत्र, संगीता भांगरे हे उपस्थित होते. मुख्याधिकारी संजय जाधव यांनी पाटणकर यांचे अभिनंदन केले. पाच आळी परिसरतील नागरिकांनी पाटणकर यांचे निवडीचे स्वागत केले

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com