संभाजीराजेंनी १६ जूनचे आंदोलन पुढे ढकलावे

भाजप नेते राधाकृष्ण विखे-पाटील यांची विनंती
संभाजीराजेंनी १६ जूनचे आंदोलन पुढे ढकलावे

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

छत्रपती संभाजी महाराजांनी राज्यातील मराठा संघटनेच्या एकत्रित बैठकीला यावे. समाजाचा दबाव वाढला की नेते मंडळी पुढे येतील. त्यामुळे छत्रपती संभाजी महाराज यांनी त्यांचे १६ जूनचे आंदोलन पुढे ढकलावे, अशी विनंती भाजप नेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केली...

मराठा आरक्षणाबाबत सोमवारी (दि.७) जिल्ह्यातील संघटनांशी चर्चा केल्यानंतर पत्रकार परिषदेत त्यांनी पक्षाची भूमिका मांडली.

भाजपच्या वतीने मराठा आरक्षणासंदर्भात बैठक घेतली. समाज बांधवांच्या भावना जाणून घेण्यासाठी बैठका घेतो आहे. राज्यभरातील समाजबांधवांना बोलावण्यात आले होते. यावेळी आंदोलनाच्या भविष्यातील रणनीतीबाबत चर्चा केली.

लोकांमध्ये प्रचंड असंतोष आहे. सगळ्या संघटनेच्या नेत्यांनी एकत्र यावे असे मी आवाहन केले होते. लोणीला याबाबत बैठक झाली. विनायक मेटे, संभाजी महाराज यांनादेखील आम्ही एकत्र आणणार आहोत. राज्यात २३ मराठा संघटना आरक्षणासाठी काम करत आहेत. मग भूमिका वेगळी का असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

सरकार समाजात फूट पाडून स्वार्थ साधण्याचा प्रयत्न करत आहे. पदोन्नती आणि आरक्षणाच्या मुद्दयावर समाजातील नेत्यांनी तात्काळ राजीनामा द्यायला हवा. खासदारांनी एकत्र आले पाहिजे ही आमची भूमिका आहे. मी आज किंवा उद्या संभाजी महाराजांशी याबाबत बोलणार आहे. माझी भूमिका समन्वयाची असल्याचे विखे-पाटील म्हणाले.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com