नाशिक । Nashik

संभाजी ब्रिगेडतर्फे राष्ट्रसंत गाडगे महाराज जयंती येथील गाडगे महाराज धर्मशाळा येथे साजरी करण्यात आली.

सत्यशोधक प्रबोधनकार राष्ट्रसंत गाडगे महाराज विद्रोही संत परंपरेचा कणा अंधश्रद्धेला मुठ माती देऊन प्रबोधनाची अविरत चळवळ कृतीतून सर्वसामान्यांपर्यंत सोप्या वाणीतून पोहचवली. दिवसा गावातील व रात्री प्रबोधनात्मक कीर्तनातून लोकांच्या मेंदूतील घाण साफ करण्याचं काम या संता ने केले.

कुठलीही अपेक्षा न बाळगता आजच्या बुवा बाबा सारखे थोतांड उभे न करता कृतीतून प्रबोधन केले. निराधार गोरगरीब कुटुंबांना आश्रय दिला. पहिली देखील न शिकलेले गाडगे महाराज विज्ञानवादी भूमिका मांडून विद्वानांना प्रश्न करून निरोत्तरीत केले. असे प्रतिपादन शहराध्यक्ष प्रफुल्ल वाघ यांनी केले.

कार्यक्रम प्रसंगी उपस्थित परिसरातील महिला प्रमिला खाडे व प्रमिला जाधव, सचिव नितीन रोठेपाटील, कार्याध्यक्ष बाळासाहेब खैरे, विक्रम गायधनी, विकी ढोले, गणेश सहाणे, ललित निर्भवने, रोशन घरटे, लकी बावस्कर, राजेश गौतम, सनी ठाकरे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.