महात्मा फुले आम्हाला पूजनीय: भुजबळ

ज्येष्ठ कवी, समीक्षक डॉ. यशवंत मनोहर यांना समता पुरस्कार प्रदान
महात्मा फुले आम्हाला पूजनीय: भुजबळ

पुणे । प्रतिनिधी | Pune

मतुम्हालाफ पूजनीय असलेल्या सरस्वतीचे आम्हा उपेक्षित, दलित, वंचितांच्या शिक्षणामध्ये (education) काहीही योगदान नसल्याने आम्ही सरस्वतीचे पूजन मान्य करीत नाही.

त्यापेक्षा महात्मा फुले (mahatma phule), सावित्रीबाई फुले (Savitribai Phule), भाऊराव पाटील (Bhaurao Patil) यांनी शिक्षणाची गंगा दारोदारी नेली आणि गावागावापर्यंत नेली त्यामुळे ते आमच्यासाठी पूजनीय आहेत, असे मत राष्ट्रवादीचे नेते आणि अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे संस्थापक-अध्यक्ष छगन भुजबळ (Chhagan Bhujbal, Founder-President of All India Mahatma Phule Samata Parishad) यांनी व्यक्त केले.

अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने आज महात्मा फुले यांची 132 वी पुण्यतिथी आणि समता दिनानिमित्त यंदाचा मसमता पुरस्कारफ ज्येष्ठ कवी, समीक्षक डॉ. यशवंत मनोहर (Senior poet, critic Dr. Yashwant Manohar) यांना ज्येष्ठ नेते आणि अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे संस्थापक-अध्यक्ष छगन भुजबळ (chagan bhujbal) यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला, त्यावेळी भुजबळ बोलत होते.

एक लाख, महात्मा फुले पगडी, मानपत्र, शाल आणि स्मृतीचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. समता भूमी, महात्मा फुले स्मारक येथे झालेल्या या कार्यक्रम प्रसंगी व्यासपीठावर ज्येष्ठ नेते बाबा आढाव, रूपाली चाकणकर, कमल ढोले-पाटील, मंजिरी धाडगे, पंकज भुजबळ, समीर भुजबळ, प्रा. हरि नरके, अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे कार्याध्यक्ष बापू भुजबळ, विभागीय अध्यक्ष प्रित्येश गवळी, नगरसेविका मनीषा लडकत, माजी आमदार जयदेव गायकवाड, माजी महापौर वैशाली बनकर, पुणे शहराध्यक्ष पंढरीनाथ बनकर, पुणे शहर अध्यक्षा वैष्णवी सातव आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी बोलताना छगन भुजबळ म्हणाले की, ओबीसी समाजाच्या (obc community) मागण्यांसाठी आपले समाज बांधवच एकत्र येत नाहीत, ही शोकांतिका आहे. सहा डिसेंबरला मुंबईत लाखोंच्या संख्येने पोहोचणार्‍या अनुयायांना मुंबईत या आणि आपल्या महामानवाला वंदन करा, हे सांगावे लागत नाही. तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांना वंदन करण्यासाठी रायगडावर मोठ्या संख्येने शिवभक्त जमतात, त्यांना देखील सांगावे लागत नाही.

मग आपल्याच समाजातील लोकांमध्ये ही उदासीनता का दिसून येते, हे कोडे मला न सुटणारे आहे. सरकार कोणाचेही असो महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्याशी संबंधित कोणताही विषय असला, तरी त्यात अनेक अडचणींना सामोरे जावे लागते आणि अशा अडचणीच्या वेळी ज्या प्रमाणात समाजाने पाठीशी उभे राहिले पाहिजे, त्या प्रमाणात आपला समाज पाठीशी उभा राहात नाही.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकासाठी सरकारतर्फे हजारो कोटी रूपये दिले जातात, मग हाच न्याय आम्हास लावून भिडे वाडा स्मारकासाठी का नसतो? तसेच गंजपेठेतील महात्मा फुले वाडा ते पुणे महानगरपालिकेचे सावित्रीबाई फुले सभागृह हा रस्ता देखील का जोडून मिळत नाही, हा देखील प्रश्न आहे. दगडुशेठ हलवाई गणपती समोर अथर्वशीर्ष म्हणण्यासाठी हजारो महिला स्वयंस्फूर्तीने जमा होतात, परंतु, त्याच मंदिरासमोरील भिडे वाडा येथे माथा टेकण्यासाठी कोणीही जात नाही.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये सुरू करण्यात आलेला अथर्वशिर्षाच्या अभ्यासक्रमावर उपहासात्मक टीका करत अभियांत्रिकी आणि इतर अभ्यासक्रम बंद करून 33 कोटी देवांचे अभ्यासक्रम सुरू करा, असा उपहासात्मक सल्ला भुजबळ यांनी यावेळी दिला. आज राज्य आणि केंद्रात फुले-शाहू-आंबेडकर यांच्या विचारांचे सरकार नसल्याने महापुरूषांची विटंबना केली जात आहे. आपला लढा अजून संपलेला नसून डॉ. यशवंत मनोहर यांच्यासारख्या विचारवंतांना सोबत घेऊन आपल्याला लढावे लागणार आहे, असेही ते यावेळी म्हणाले.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com